शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : वर्ध्यात १०० रुपयांचे नाममात्र पेट्रोल, नागरिक संतापले

By admin | Updated: August 16, 2016 14:50 IST

वर्ध्यातील एका पेट्रोलपंपवर एका ग्राहकाला शंभर रुपयांचे अत्यल्प पेट्रोल दिल्यावरुन संतप्त नागरिकांनी पेट्रोल मालकाला सुमारे तीन तास वेठीस धरले.

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. १६ - शहराच्या मध्यभागी असलेल्या आयुष पेट्रोलपंपवर एका ग्राहकाला शंभर रुपयांचे अत्यल्प पेट्रोल दिल्यावरुन संतप्त नागरिकांनी पेट्रोल मालकाला सुमारे तीन तास वेठीस धरले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पेट्रोल पंपावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथक, मार्शल पथकासह दोन ठाणेदार, चार पोलीस उपनिरीक्षक व शिपायांचा ताफा घटनास्थळावर नियंत्रण ठेवून आहेत.
किशोर देशमुख यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले होते. ते सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास आपले वाहन ढकलत आयुष पेट्रोल पंपवर पोहचले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला १०० रुपयांचे पेट्रोल गाडीत टाकायला सांगितले. पेट्रोल टाकल्यानंतर त्यांना कमी पेट्रोल टाकल्याचा संशय आला. यानंतर वाहन बाजुला उभे करुन एका दुकानातून पाण्याची बाटली विकत घेतली. त्यातील पाणी फेकून दिले आणि त्यामध्ये वाहनात टाकलेले पेट्रोल ओतले असता त्यामध्ये अत्यल्प पेट्रोल दिसले. आपली शुद्ध फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच त्यांनी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याला याचा जाब विचारला असता कर्मचा-यांनी त्यांना उध्दटपणे उत्तरे दिली. यावरुन त्यांच्यात वाद सुरू झाला. हा प्रकार नेहमीचाच असल्याची बाब लक्षात येताच तेथील काही वाहन चालकांसह परिसरातील नागरिकांनी पेट्रोलपंपाकडे धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. बघता बघता शेकडोंचा संतप्त जमाव पेट्रोलपंपवर चालून गेला.
ही बातमी शहरात पसरताच अनेकजण घटनास्थळ गाठून पेट्रोलपंप मालक, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना कडक शब्दात खडसावू लागले. गर्दी वाढतच होती. कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. काही वेळातच शहरचे ठाणेदार राजेंद्र शिरतोडे, रामनगरचे ठाणेदार विजय मगर, पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके, पपीन रामटेके, सतीश खेडेकर, संजय खोंडे हे पोलीस ताफ्यासह दाखल झाले. परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून दंगलनियंत्रण पथक व मार्थल पथकाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसील कार्यालयातून नायब तहसीलदार जी.सी. बर्वे व पुरवठा निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन लेखी स्वरुपात तक्रार लिहून घेतली. यावेळी वजनमाप विभागाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनीही याप्रकरणी किशोर देशमुख या ग्राहकाला लेखी तक्रार मागितली आहे.
 
फसवणुकीचा प्रकार नेहमीचाच
सदर पेट्रोल पंपवर कमी पेट्रोल देण्याचा प्रकार नेहमीचाच असल्यामुळे नागरिक सांगत होते. एखाद्या ग्राहकाने जाब विचारला तर सर्व कर्मचारी एकत्र येऊन त्याला तेथून हाकलून लावत असल्याचाही प्रकार येथे घडत असल्यामुळे कोणीही पुढे तक्रार करण्यास धजावत नव्हते. आज एकाचवेळी दोन तीन फसवणूक झालेले ग्राहक तिथे जमल्याने अन्य नागरिक या ठिकाणी धावून गेल्याचे दिसले.