शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - शरीअतच्या समर्थनार्थ मुस्लिम महिलांचे धरणे

By admin | Updated: October 21, 2016 21:33 IST

मुस्लिम पर्सनल लॉ मधील शरीअतवर आक्षेप नोंदवून केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो मुस्लिम महिलांनी धरणे दिलेत

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. २१ : मुस्लिम पर्सनल लॉ मधील शरीअतवर आक्षेप नोंदवून केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो मुस्लिम महिलांनी धरणे दिलेत. धरणे आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. अकोला शहरात प्रथमच एवढ्या मोठ्याप्रमाणात मुस्लिम महिला धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

तलाक प्रथेवर आक्षेप घेणारी याचिका शासनाने परत घ्यावी. शरीअत कायद्याला मुस्लिम महिलांचे समर्थन आहे. शासनाने मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये ढवळा-ढवळ करू नये. संविधानिक हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास हाणून पाडल्या जाईल असा ईशारा येथे दिला गेला. दुपारी तीन वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत बुरखाधारी महिला धरणे आंदोलनात सहभागी होत होत्या. जमाअत- ए-इस्लामी, हिंद, अकोला महिला विभागच्या सलमा सरवत आणि गर्ल्स इस्लामिक आॅर्गनायजेशन आॅफ इंडिया अकोलाच्या एमन खान यांनी या धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले.

बुरखाधारी महिलांच्या हाती मुस्लिम लॉ आणि शरीयत समर्थनाचे फलक हाती होते. शाळा, महाविद्यालयीन युवती आणि बुरखाधारी महिलांनी हा परिसर व्यापला होता. शहरातील विविध भागांत पायी आणि वाहनातून धरणे आंदोलनात महिला सहभागी होऊ लागल्याने पोलिस बंदोबस्त तातडीने येथे वाढविला गेला. मुस्लिम महिलांसोबत पुरूष मंडळीही येथे मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. आंदोलनातील महिलांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून आपल्या भावना व्यक्त केल्यात. निवेदन दिल्यानंतर या महिलांनी येथे शरीअत संदर्भातील मनोगत जाहीरपणे मांडलेत. धरणे आंदोलनानंतर येथे टाकल्या गेलेला पाणीपाउचचा कचराही सहभागी झालेल्या महिलांनी तातडीने उचलून नवा आदर्श निर्माण केला.