शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: महापालिका इंजिनिअरांची बिल्डरांसोबत दारू पार्टी

By admin | Updated: February 5, 2017 16:54 IST

ऑनलाइन लोकमत वसई, दि. 5 - वसई विरारमध्ये महापालिकेत ठेका पद्धतीवर काम करणारे ठेकेदार अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांसोबत पार्टीत ...

ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 5 - वसई विरारमध्ये महापालिकेत ठेका पद्धतीवर काम करणारे ठेकेदार अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांसोबत पार्टीत दारू पिऊन बेधुंद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी  सुट्टी असतानाही महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी 12 इंजिनिअरांना निलंबित केले.
 वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्ससोबत चक्क महापालिकेच्या इंजिनिअर्सनी दारु पिऊन डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. स्वरुप खानोलकर नावाच्या पालिकेतील ठेका इंजिनिअरच्या बर्थडे पार्टीचे 24 जानेवारीला विरारच्या एका रिसॉर्टमध्ये  आयोजन करण्यात आलं होतं. पार्टी जरी खाजगी असली, तरी हा प्रकार अशोभनीय असल्याचं म्हटलं जातं.
स्वरूप खानोलकर ( मुख्य अभियंता अनधिकृत) बांधकाम यांच्यासह पार्टीत नरेंद्र संखे , योगेश सावंत, रोशन भागात , केयूर पाटील , प्रवीण मुलीक , निनाद सावंत , कौस्तुभ तामोरे , निलेश मोरे , इंद्रजीत पाटील , परमजीत वर्तक ,  युवराज पाटील यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या  बिल्डरासोबत मद्यधुंद नाच केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे येथे फटाक्यांची आतषबाजी , डीजे होता , विदेशी मद्यही होते. वसईच्या समुद्रकिनारी रात्री  उशीरापर्यंत ही जंगी पार्टी सुरु होती.   
महापालिकेत कायमस्वरूपी अधिकारी असताना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे अधिकार आयुक्त लोखंडे यांनी ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या खानोलकरकडे दिले होते. खानोलकर यांच्या अहवालानंतर कारवाई केली जात होती. कायमस्वरूपी अधिकाऱ्यांना खानोलकर यांच्या हाताखाली काम करावे लागत होते. त्यामुळे अधिकारानंमध्ये तीव्र नाराजी होती. तर दुसरीकडे खानोलकर आणि नरेंद्र संखे यांच्या कार्य पद्धतीवर संशय व्यक्त केला जात होता. आता ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या इंजिनियरांचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या असलेले साटेलोटे उजेडात आले आहेत.
 

https://www.dailymotion.com/video/x844qgi