शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

VIDEO- जमिनीला मिळाला कवडीमोल दर; धरणही उठले मुळावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2016 22:06 IST

शेतीला शाश्वत सिंचनाची सोय मिळणार, या आशेने शेतकऱ्यांनी ८ वर्षांपूर्वी आपल्या लाखमोलाच्या जमिनी अगदीच कवडीमोल दरात धरणासाठी दिल्या

सुनील काकडे/ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 16 - शेतीला शाश्वत सिंचनाची सोय मिळणार, या आशेने शेतकऱ्यांनी ८ वर्षांपूर्वी आपल्या लाखमोलाच्या जमिनी अगदीच कवडीमोल दरात धरणासाठी दिल्या. मात्र प्रारंभीपासून रेंगाळलेले धरणाचे काम, रस्त्यांअभावी शेतात जाण्याची बंद झालेली वहिवाट, खंडित असणारा विद्युत पुरवठा, धरणाच्या बुडित क्षेत्रात उगवलेली झाडे यासह असंख्य समस्यांनी फायदेशीर ठरू पाहणारे धरण अक्षरश: शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.वाशिम जिल्ह्यातील कवठळ (ता. मंगरूळपीर) येथील शेतकऱ्यांसंदर्भातील हा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असताना प्रशासकीय यंत्रणेला मात्र त्याचे कुठलेच सोयरसुतक राहिलेले नाही. ८ वर्षांपूर्वी कवठळला सिंचन प्रकल्प मंजूर झाला. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने लाखमोलाच्या जमिनी लघूसिंचनला ७० हजार रुपये प्रतिएकराने संपादित करून दिल्या. मात्र, मध्यंतरीचे सुमारे ७ वर्षं या धरणाचे काम प्रचंड प्रमाणात रेंगाळले. धरणाची भिंत उभारत असताना त्या ठिकाणी असलेली झाडे मुळासकट न उखडल्यामुळे धरणाच्या बुडित क्षेत्रात आजमितीस शंभरावर मोठी झाडे उभी झाली आहेत. यामुळे धरणाला धोका उद्भवण्यासोबतच मत्स्यव्यवसायावरही गदा आली आहे. धरणाच्या दोन्ही बाजूंनी गावातून शेतात जाण्यासाठी असलेला जुना रस्ता थातूरमातूर स्वरूपात तयार झाला. सद्या या रस्त्यावरून साधी बैलगाडी देखील जावू शकत नाही. विद्यूत पुरवठ्यासंबंधीच्या विविध समस्यांमुळेही शेतकरी अक्षरश: हैराण झाले आहेत. लघूसिंचन विभागाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे...........................शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, या हेतूने कवडीमोल दराने शासनाला जमीन दिली. मात्र, धरणाचे काम अत्यंत बोगस झाल्याने विविध समस्या उद्भवल्या आहेत. मध्यंतरी विद्यूत खांब कोसळल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले.-संजय देशमुख, शेतकरी, कवठळ