शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

VIDEO - महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केल्याची ललिताला खंत

By admin | Updated: August 24, 2016 20:03 IST

महाराष्ट्राची अॅथलिट ललिता बाबरने महाराष्ट्र सरकारने अद्यापपर्यंत दखल न घेतल्याबद्दल खंत व्यक्त केली.

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. २४ - ‘मला केंद्रशासनाचा अर्जून पुरस्कार मिळाला मात्र; राज्यशासनाचा अद्याप कोणताही पुरस्कार मिळाला नसल्याची खंत रिओ आॅलिंपिक मध्ये चमकदार कामगिरी करणारी महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर हिने बुधवारी पुण्यात व्यक्त केली. तसेच धावपटूंना सराव सिंथेटीक ट्रॅकवर, तर स्पर्धा आॅलिम्पिक ट्रॅकवर करावी लागते. या विरोधाभासाकडे लक्ष वेधून तिने आंतरराष्ट्रीय सुविधेचा आभाव असल्याचे आधोरेखित केले. 

 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ललिता बाबर हिच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ललिता म्हणाली, , देशासाठी खेळण्याचा आनंद खुप मोठा आहे. पदक मिळाले नसले तरी आंतरराष्ट्रीय धावपटूंबरोबर खेळण्याची, त्यांच्याकडून अनुभव घेण्याची संधी मिळाली. आॅलिम्पिकमध्ये प्रथमच सहभागी होत असल्याने अनुभवाची कमी होती. या स्पर्धेत फार थोड्या फरकाने माझे पदक हुकले. मात्र, ही संधी २०२०च्या टोकिया आॅलिम्पिकमध्ये भरुन काढली जाईल. 

भारतामध्ये सर्वत्रच सिंथेटिक ट्रॅक आहेत तर आॅलिम्पिकमध्ये मोडल ट्रॅकचा वापर केला जातो. त्याचा परिणामही खेळाडूवर होऊन चार ते पाच सेकंदाचा फरकही पडत असतो. आॅलिम्पिकसाठी चार वर्षे सिंथेटिकवर सराव केल्यानंतर खेळाडूला आॅलिम्पिकच्या ट्रॅकवर धावावे लागते. त्यामुळे त्याबाबतची सुविधाही भारतामध्ये निर्माण करता आली तरी पदकाची संख्या वाढेल. भारतात सुविधा नाहीत, असे नाही; पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळायला हव्यात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रॅक स्पर्धेसाठी मिळत नाही. सराव वेगळ्या ट्रॅकवर आणि स्पर्धा वेगळ्या ट्रॅकवर या परिस्थितीचा आम्हाला सामना करावा लागतो. खेळाडू एवढी मेहनत घेत असतो. तेव्हा त्याला सुविधाही तशा मिळायला हव्यात असेही ती म्हणाली.अथलेटिक्स संघटनेकडून दुर्लक्ष रिओहून परतल्यानंतर महाराष्ट्र आॅलिंपिक संघटना आणि ज्या संघटनेसाठी आपण खेळतो त्या अ‍ॅथलेटिक्स संघटने मधील एकही पदाधिकारी आपल्या स्वागतासाठी आला नसल्याची जाहीर नाराजीही तीने व्यक्त केली.त्यांच्यासाठी आम्ही राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत खेळत असतो. खेळाडूंना संघटनेचा पाठिंबा महत्त्वाचा असतो अशा शब्दात तीने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच स्पर्धेहून आल्यानंतर खेळांडूवर बक्षिसांचा वर्षाव होतो. मात्र, त्या स्पर्धेला जाण्यापूर्वी चांगल्या सुविधांसाठी हा खर्च केल्यास खेळाडूंना त्याचा फायदा होईल. त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही ती म्हणाली. जैशा बाबत घडलेला प्रकार चुकीचा धावपटू ओ. पी. जैशाने रिओ मॅरेथॉनमध्ये आपल्याला पाणीही मिळाले नसल्याचा आरोप केला. याबाबत विचारले असता ललिता म्हणाली, की त्या वेळी नेमके काय घडले हे मला माहिती नाही. मी माझ्या शर्यर्तीवर लक्ष केंद्रित केले होते. माझे लक्ष विचलीत होऊ नये, यासाठी हे प्रकरण माझ्या पासून लांब ठेवण्यात आले. पण तिला पाणी मिळाले नसेल, तर हे चुकीचेच आहे. अशा स्पर्धांमध्ये खूप धावावे लागते. त्यामुळे पाणी आणि एनर्जी ड्रींकची काही ठरावित अंतरानंतर गरज असते. त्यामुळे जैशा बाबत घडलेला प्रकार निश्चितच चुकीचा असल्याचे ललिता बाबरने स्पष्ट केले. सुवर्णयुग मित्रमंडळाकडून एक लाखांचा पुरस्कार रिओ आॅलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणारी आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर हिला धनकवडीतील श्री सुवर्णयुग तरुण मंडळाने एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये ललिता बाबर हिच्याशी वातार्लाप कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. त्यानंतर तिला गौरविण्यात आले. उद्योजक गणेश भिंताडे, निवृत्ती जाधव, राहुल सूर्यवंशी, गणेश दिघे या वेळी उपस्थित होते.