शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- कात्रज प्राणिसंग्रहालयातील नवे पाहुणे तेजस, सुब्बी प्रेक्षकांच्या भेटीला

By admin | Updated: April 9, 2017 13:52 IST

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 9 - मागील जवळ जवळ चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी जेव्हा तेजस व सुब्बी ही सिंहाची ...

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 9 - मागील जवळ जवळ चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी जेव्हा तेजस व सुब्बी ही सिंहाची जोडी आवास पिंजऱ्यातून बाहेर आली. त्यानंतर त्या जोडीला पाहणा-यांची अक्षरशः झुंबड उडाली. अनेकांनी गर्दीतून शिट्टी व टाळ्यांनी त्या जोडीचे स्वागत केले.जंगलाचा राजा आणि राणी बाहेर येताच अनेकांचे कॅमेरा फोटो काढण्यासाठी सरसावले होते, यात बच्चेकंपनीला उत्सुकता होती, अनेक पालक देखील यात सहभागी झाले होते. जंगलच्या राजाराणीची ही जोडी अजिबात घाबरली नाही, न बावरता प्रेक्षकांना सामोरी जाऊन पोजमध्ये फोटो काढण्यासाठी उभे राहिले होते. अंदाजे 4 ते साडेचार फूट उंचीची दणकट यष्टी, त्याबरोबरच मानेवर असणारे आयाळ असलेला तेजस राजासारखा शोभत होता.या उपक्रमाचा शुभारंभ महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप तसेच प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यासह या विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. आशियाई सिंह असण्याचे राज्यातील हे पहिलेच संग्रहालय असल्याने याची मोठी उत्सुकता होती. गुजरातहून आलेल्या तेजस आणि सुब्बी या सिंहाच्या जोडीला रविवारी नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. या जोडीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या शिरपेचात एक नवीन तुरा रोवला गेला.राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात साडेसहा वर्षांचा तेजस आणि सुब्बी या आशियाई सिंहाच्या जोडीला 21 डिसेंबर 2016 रोजी गुजरात येथील जुनागडच्या शक्करबाग प्राणिसंग्रहालयातून आणण्यात आले. या जोडीला आतापर्यंत तज्ज्ञांच्या निगराणीमध्ये प्रेक्षकांपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यांना येथील वातावरण अनुकूल झाल्याने सध्या पांढऱ्या वाघाच्या खंदकात या जोडीची सोय करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र खंंदक बांधण्यात येत आहे.

https://www.dailymotion.com/video/x844v9x