शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ - मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती

By admin | Updated: August 2, 2016 10:02 IST

नाशिक जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा करणारी धरणे दुथडी भरुन वाहत असली तरी, यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. २ - नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी धरणे दुथडी भरुन वाहत असली तरी, यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विर्सग सुरु असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून,  रामसेतू आणि दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेले आहे. 
 
नाशिक गंगापूर धरणातून 12 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने रामकुंड परिसर पुराच्या पाण्याखाली गेला आहे. राज्यातून आलेल्या अनेक नागरिकांना रामकुंडा ऐवजी मालवीय चौकात दशक्रिया विधी करावा लागला आहे. 
 
परिसरातील भांडी बाजारातही पुराचे पाणी शिरले आहे. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आले आहे.
 
 
दिंडोरी 
दिंडोरी तालुक्यात रेकॉर्डब्रेक मुसळधार पाऊस झाला असून सर्व नदी नाल्यांना महापूर आला आहे. अनेक रस्त्यावरील पूल फरशी पाण्याखाली गेल्याने  अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पालखेड धरणमधून 15841 क्युसेस पाणी सोडले असून अजून पाणी सोडावे लागणार आहे.कादवा नदीकाठच्या तसेच सर्व नदी नाले काठच्या जनतेने सावधानता बाळगावी. पूल फरचीवरून  पाणी वाहत असल्यास वाहने नेऊ नये  असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नाशिक कळवण  रस्त्यावर रणतले येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाले आहे
दिंडोरी तालुका पर्जन्यमान
दिंडोरी     - 142.0 mm
मोहाडी    - 80.0 mm
वणी        - 80.0 mm
उमराळे    - 136.0 mm
कोशिंबे    - 92.0 mm
ननाशी     - 82.0 mm
वरखेडा   - 85.0 mm