शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - नर्तकी कंचनीच्या महालाला गुप्तधन शोधणा-यांचे ग्रहण

By admin | Updated: November 2, 2016 17:37 IST

मेहकर येथे प्रसिद्ध नर्तकी कंचनीचा महाल म्हणून शेकडो वर्षांपासून दोन मजली ऐतिहासिक वास्तू उभी आहे. ही वास्तू बघण्याकरिता देश विदेशातून पर्यटक येतात.

ऑनलाइन लोकमत/उद्धव फंगाळ
मेहकर (बुलडाणा), दि. 11 -  मेहकर येथे प्रसिद्ध नर्तकी कंचनीचा महाल म्हणून शेकडो वर्षांपासून दोन मजली ऐतिहासिक वास्तू उभी आहे. ही वास्तू बघण्याकरिता देश विदेशातून पर्यटक येतात. मात्र, गत काही दिवसांपासून या वास्तूमध्ये गुप्तधन शोधणा-यांनी खड्डे खोदून ठेवले असून, यामुळे या वास्तूला धोका निर्माण झाला आहे.
मेहकर येथे शेकडो वर्षांपूर्वी कंचनी नावाची एक नर्तकी वास्तव्यास होती. तिचा नाच बघण्याकरिता दूरदरवरून राजे - महाराजे येत होते. हे महाराजे कंचनीचा नाच बघून सोने, चांदी, हिºयांच्या दागीण्यांची उधळण तिच्यावर करीत होते. काही वर्षांनी कंचनीचे वैभव वाढले. तिने तीन मजली ऐसपैस असा महाल बांधला. या महालातही घुंगरूच्या तालावर कंचनीच्या विशेष अदाकारीसह नाच व्हायला लागला. लोणार येथे कमळजा मातेचे मंदिर आहे. या मंदिरात पूर्वी अखंड दिवा लावण्यात येत होता.  हा दिवा मेहकरमधील महालावरून पाहण्याची कंचनीची इच्छा झाली. तिने सात मजले बांधले. मात्र, दिवा पाहण्यासाठी गेली असता तिचा मृत्यू झाला, अशी अख्यायिका सांगण्यात येते. यावेळी तिच्याजवळील दागिने या महालाखाली जमिनीत गाडल्याची दंतकथा येथे प्रसिद्ध आहे. त्यामुळे गुप्तधनाचा शोध घेणारे अनेकजण महालात खड्डे खोदतात. कंचनीचा महाल ही ऐतिहासिक वास्तू असून, या महालाची बांधकाम शैली पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात. मात्र, या महालात ठिकठिकाणी खड्डे करण्यात आल्याने पर्यटकांना आतमध्ये फिरताना अडचणींचा सामना करावा लागतो.याकडे पुरातत्व खात्याने लक्ष पुरविण्याची गरज आहे.