ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १४ - दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळयात लोणावळयातील प्रसिद्ध भुशी डॅम परिसरात पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी मुंबई-पुण्यातून तरुण पर्यटक मोठया संख्येने येत आहेत. त्यामुळे परिसरात मोठया प्रमाणावर कोंडी होत आहे.
भुशी डॅम परिसरात झालेल्या गर्दीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा भुशी डॅमला जाण्याच्या विचारात असाल तर तो विचार बदलाल. लोणावळा परिसर शनिवारी हाऊसफुल झाला होता.
तब्बल चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्याने भुशी डॅम आणि लायन्स पॉर्इंट पर्यंत हजारो पर्यटक जाऊ शकले नव्हते. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे पोलीसही हतबल झाले होते.