शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे व्हिडीओ क्लिप फेटाळल्या

By admin | Updated: February 5, 2017 23:49 IST

महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विकासकामांची माहिती दिली जात असल्याचे चित्रीकरण होते

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विकासकामांची माहिती दिली जात असल्याचे चित्रीकरण होते. मात्र प्रचारात शासकीय कर्मचाऱ्यांना सहभागी होता येत नसल्याने जाहिरात प्रसारण समितीकडून या व्हिडीओ क्लिपला मंजुरी नाकारण्यात आली आहे. आतापर्यंत समितीकडे आलेल्या प्रचाराच्या ३१ व्हिडीओ क्लिपपैकी १५ व्हिडीओक्लिपना मंजुरी देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोशल मीडियावर प्रचार करावयाच्या तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यम, व्हॅनच्या आधारे प्रचार करायच्या व्हिडीओ क्लिप जाहिरात प्रसारण समितीकडून तपासून घेणे बंधनकारक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे तसेच अपक्षांच्यावतीने ३१ व्हिडीओ क्लिप तपासणीसाठी समितीकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील काही क्लिपमध्ये तांत्रिक चुका आढळून आल्या तर काही क्लिपमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामध्ये योग्य त्या दुरुस्ती करून त्या पुन्हा समितीपुढे सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवार व विविध राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या ध्वनीचित्रफिती जाहिरात प्रसारण समितीद्वारे तपासणी करण्यात येतील. संबंधित इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांकडून आवश्यक दुरुस्त्या करून दिल्यास त्यांनाही त्वरित मान्यता दिली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.