शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: बुलडाणा - मेंढपाळांची मुले घेत आहेत काँन्व्हेंटमध्ये शिक्षण

By admin | Updated: July 9, 2016 19:23 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात सध्या वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांची मुले आता काँन्व्हेंटमध्ये शिक्षण घ्यायला लागली आहेत

विवेक चांदूरकर / ऑनलाइन लोकमत -
एका ठिकाणी चार महिन्यांचेच वास्तव्य
बुलडाणा, दि. 09 -  अंगावर काँन्व्हेंटचा गणवेश, पाठीवर दफ्तर अन हातात वॉटरबॅग घेवून शाळेत जाणारे विद्यार्थी सर्वत्रच दिसतात. मात्र, हे चित्र जेव्हा जंगलात राहुट्या टाकून वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ्यांच्या वस्तीत दिसते तेव्हा मन थक्क होते. पिढ्यांपिढ्यांपासून देशभर रानोमाळ हिंडून मेंढ्या चारून आपली उपजिवीका भागविणा-या मेंढपाळ्यांच्या जीवनातही आता शिक्षणाचा किरण उगवला आहे. जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात सध्या वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांची मुले आता काँन्व्हेंटमध्ये शिक्षण घ्यायला लागली आहेत. शिक्षणातून विकास साधता येतो, याचे महत्व कळल्यामुळेच निरक्षर असलेल्या आई वडिलांनी मुलांना काँन्व्हेंटमध्ये प्रवेश दिला आहे. 
 
बुलडाणा ते खामगाव मार्गावर ज्ञानगंगा अभयारण्यात परराज्यातील मेंढपाळ वास्तव्यास आले आहेत. चार महिने येथे त्यांचे वास्तव्य असणार आहे. पहाडाच्या पायथ्याशी छोट्या छोट्या झोपड्या टाकून मेंढपाळ वास्तव्यास आहेत. त्यांच्या तांड्यातील कुणालाही साधी अक्षर ओळखही नाही. मात्र जे आपल्या वाट्याला आले ते आपल्या मुलांच्या वाट्याला येवू नये यामुळे मुलांना शाळेत शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या मुलांना जवळच असलेल्या रोहणा येथील सर्वज्ञ ज्ञानपीठ या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. मुलांना दररोज शाळेत घेवून जाण्याकरिता वाहनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या वस्तीतील आकाश ठोंबरे, सुशील ठोंबरे, वैशाली पिसाळ, संतोष पिसाळ ही मुले चवथ्या वर्गात शिक्षण घेत असून, त्यांच्यासोबत १३ मुले दररोज शाळेत ये - जा करतात. 
 
अंगावर काँन्व्हेंटचा गणवेश, पाठीवर दफ्तर अन हातात वॉटरबॅग घेवून ही मुले सकाळी  निघतात. शिक्षणासाठी लागणारा सर्व खर्च, त्यांची पुस्तके पालक करतात. मुलेही दररोज नित्यनेमाने शाळेत जातात. मेंढ्यांच्या सहवासात रात्रीच्या अंधारात जंगलात राहणा-या या मुलांच्या चेह-यावर शाळेत जाण्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. येथे विद्युत पुरवठा नसल्यामुळे रात्री अंधार असतो. दररोज सकाळी उठून मुले अभ्यास करतात. त्यानंतर शाळेत जातात. शिक्षणापासून कोसो दूर असलेले मेंढपाळ  मुख्य प्रवाहापासून दूरच आहेत. केवळ मेंढ्यांसाठी अन्नाचा शोध घेणे, त्यांना विकून, त्यांच्या शरीरावरील केसं विकून ते उपजिवीका भागवितात. शिक्षणाचा गंधही त्यांना कधी शिवत नाहीत. मुलांचा जन्मही जंगलातील कुठल्यातरी झोपडीत होतो अन मृत्यूही अशाच अनोळखी ठिकाणी. अनेक पिढ्या अशिक्षित व निरक्षर असल्यामुळे त्यांची फसवणूक अनेकदा होते. शिक्षणामुळे मात्र या मुलांच्या जीवनात नवी क्रांती घडणार आहे.
 
ठिकाणानुसार बदलते शाळा!
मेंढपाळांचा मुक्काम बुलडाणा जिल्ह्यात चार महिन्यांसाठीच असणार आहे. त्यानंतर ते मुक्काम हलविणार असून, ज्या ठिकाणी जातील तेथील शाळेमध्ये मुलांना शिक्षण देण्यात येणार आहे. वर्षभर अशाचप्रकारे मुलांना विविध शाळांमध्ये शिक्षण घ्यावे लागते.
 
परंपरागत व्यवसाय संपण्याच्या भीतीनेच अवलंबिला शिक्षणाचा मार्ग मेंढपाळांचा मुळ व परंपरागत व्यवसाय हा मेंढ्यांची विक्री व त्यांच्या केंसांची विक्री हा आहे. आधूनिक काळात आता हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आगामी काळात मुलांना शिक्षण देवून नोकरीकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आपल्याही मुलांनी मुख्य प्रवाहात येवून नोकरी करावी याकरिता मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.