प्रविण ठाकरे
आकोला, दि. ५ - आलु पोंगे हे एकताच सर्वाना आश्चर्य वाटेल पण अकोल्यात आलु पोंगे ही डिश अतिशय लोकप्रीय आहे. आलु म्हणजे बटाटा, पोंगे किंवा पोंगापंडित म्हणून अनेकांना माहिती असेल. इंग्रजी मध्ये या पोंग्याना गोल्ड फिंगर म्हणुन ओळख आहे. शाळांच्या समोर असे पोंगे मोठया प्रमाणात विक्रीस असतात परंतु या पोंग्यासोबत आलुची जोड फक्त अकोल्यातच पाहायला मिळते. गरमागरम तळलेले पोंगे व उकडलेल्या आलु मध्ये चाट मसाला थोडी हिरवी चटणी टाकून ही डिश तयार होते. अवघ्या दहा रूपयात २० पोंगे व मसाला घातलेला आलू अशी डिश कुणाच्याही पसंतीस उतरले.
जादा पोंगे हवे असतील तर केवळ पाच रूपयात पुन्हा दहा पोंगे मिळतात. अकोल्यात साधारणपणे ५० हातगाडयांवर हा व्यवसाय चालतो एका गाडीवर दररोज किमान एक ते दोन हजाराचा गल्ला जमा होतो यावरून या डिशची लोकप्रियता लक्षात येते. प्रविण ठाकरे : आलु पोंगे हे एकताच सर्वाना आश्चर्य वाटेल पण अकोल्यात आलु पोंगे ही डिश अतिशय लोकप्रीय आहे. आलु म्हणजे बटाटा, पोंगे किंवा पोंगापंडित म्हणून अनेकांना माहिती असेल.
इंग्रजी मध्ये या पोंग्याना गोल्ड फिंगर म्हणुन ओळख आहे. शाळांच्या समोर असे पोंगे मोठया प्रमाणात विक्रीस असतात परंतु या पोंग्यासोबत आलुची जोड फक्त अकोल्यातच पाहायला मिळते. गरमागरम तळलेले पोंगे व उकडलेल्या आलु मध्ये चाट मसाला थोडी हिरवी चटणी टाकून ही डिश तयार होते. अवघ्या दहा रूपयात २० पोंगे व मसाला घातलेला आलू अशी डिश कुणाच्याही पसंतीस उतरले. जादा पोंगे हवे असतील तर केवळ पाच रूपयात पुन्हा दहा पोंगे मिळतात. अकोल्यात साधारणपणे ५० हातगाडयांवर हा व्यवसाय चालतो एका गाडीवर दररोज किमान एक ते दोन हजाराचा गल्ला जमा होतो यावरून या डिशची लोकप्रियता लक्षात येते.