शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO...अजगराला पाहुणचार तर मगरीची सर्कस !

By admin | Updated: July 17, 2016 16:30 IST

दहा फुटी अजगर अन सात फुटी मगर सापडल्याने सातारकरांमध्ये चर्चेला ऊत आलाय. एकीकडे भेकराला पकडण्याच्या नादात जखमी झालेल्या अजगराला चिकन-अंडी खाऊ-पिऊ घालण्यात

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. १७ : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दहा फुटी अजगर अन सात फुटी मगर सापडल्याने सातारकरांमध्ये चर्चेला ऊत आलाय. एकीकडे भेकराला पकडण्याच्या नादात जखमी झालेल्या अजगराला चिकन-अंडी खाऊ-पिऊ घालण्यात 'वन्यजीव' विभागाचे अधिकारी व्यस्त झालेत, तर दुसरीकडे मगरीच्या पाठीवर बसून तिला डिवचण्यात स्थानिक तरुणांनी धन्यता मानली. दरम्यान, मगरीला आता पुण्याच्या कात्रज उद्यानात पाठविण्यात आलंय.

कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये जखमी स्थितीत आढळून आलेल्या अजगरावर अद्यापही क-हाडात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून शनिवारपासून त्याला अंडी व कोंबडीच्या मांसाचा खुराक दिला जात असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाटण तालुक्यातील धानकल हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसले आहे. या गावात रस्त्याकडेला पडलेल्या अजगराला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. भेकराशी झालेल्या झटापटीत अजगराचा जबडा फाटला होता. त्यामुळे क-हाडात पशुवैद्यकीय अधिका-यांनी त्याच्या जबड्यावर सहा टाक्यांची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्याला 'वन्यजीव' विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

या अजगराला अंडी अन कोंबडीच्या मांसाचा खुराक दिला जात असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचे अधिका-यांनी 'लोकमत'ला सांगितले. प्रकृती सुधारल्यानंतर त्याला पुन्हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सुरक्षित ठिकाणी सोडले जाणार आहे.

दरम्यान, सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील कन्हेर धरणाजवळ सात फुटी मगर आढळली. सध्या त्यांचा प्रणयकाळ असल्याने हे प्राणी जलाशयाच्या काठावर आढळून येतात. येथील गावकऱ्यांनी मात्र प्रथमच मगर पाहिल्याने त्यांचा उत्साह दाटून आला.

काही तरुणांनी या मगरीच्या पाठीवर बसून अन तिला दोरीने बांधून डिवचण्याच्या प्रयत्न केला, तेव्हा चवताळलेल्या मगरीच्या हल्ल्यात कडव नामक ( रा. साबळेवाडी) तरुण जखमी झाला. मग मात्र तत्काळ वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. अखेर ही मगर कात्रज उद्यानात पाठविण्यात आली.