शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचे सूक्ष्म सिंचनाचे अनुदान थकीतच!

By admin | Updated: August 25, 2015 00:47 IST

पावसाचा दुस-यांदा पडला खंड; शेतक-यांना हवे तुषार, ठिबक संच.

अकोला : विदर्भात दुसर्‍यांदा पावसाचा खंड पडला असून, पिकांना संरक्षित ओलित करण्यासाठी, ठिबक, तुषार संचाची गरज आहे; परंतु हे संच खरेदी करण्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतीमध्ये ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करता यावा, यासाठी केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत २0१३-१४ मधील ३९ कोटी ७५ लाख रुपये अनुदान शेतकर्‍यांना अद्याप मिळाले नसून, २0१४-१५ चे १३४ कोटी ३२ लाख रुपयेही शासनाने दिले नाहीत. जिल्हानिहाय थकलेल्या रकमेचा आकडा बघितल्यास अमरावती जिल्हा २२ कोटी २३ लाख, अकोला जिल्हा ३ कोटी ५५ लाख, वाशिम जिल्हा १६ कोटी ३0 लाख, यवतमाळ १६ कोटी ४१ लाख, तर बुलडाणा जिल्हय़ाचे ९९ कोटी रुपये शासनाकडे रखडले आहेत. वर्धा जिल्हा ६ कोटी, नागपूर जिल्हा ३ कोटी ६६ लाख, गोंदिया जिल्हय़ाचे २६ लाख व चंद्रपूर जिल्हय़ाचे ७0 लाख रुपये शासनाकडे रखडले आहेत. या योजनेतील २३१ कोटींची थकबाकी शासनाने यावर्षी जुलै महिन्यात दिली, पण आपत्कालीन स्थितीचा सामना करणार्‍या विदर्भातील शेतकर्‍यांना डावलल्याने शासनाप्रती नाराजीचा सूर आहे. विदर्भ सघन सिंचन विकास योजनेंतर्गत मंजूर अनुदान अद्याप तरी मिळाले नाही. अकोला जिल्हय़ाचे यामध्ये साडेतीन कोटींच्यावर अनुदान आहे. हे अनुदान मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे कृषी उपसंचालक शांताराम मालपुरे यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.

*विदर्भावर सातत्याने अन्याय

        विदर्भातील शेतकर्‍यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत येथील शेतकर्‍यांना ठिबक, तुषार संच खरेदीसाठी अनुदान दिले जाते; तथापि गत दोन वर्षांंपासून या योजनेंतर्गत मंजूर झालेली रक्कम शेतकर्‍यांना मिळाली नाही. यावर्षी विदर्भात दुसर्‍यांदा पावसाचा खंड पडला आहे. अशावेळी शेतकर्‍यांना संरक्षित सिंचन करण्यासाठी ठिबक, तुषार संच खरेदीकरीता अनुदानाची गरज होती; तथापि नेमके विदर्भातील शेतकर्‍यांचेच अनुदान शासनाकडे थकले आहे. त्यामुळे शासन अन्याय करीत असल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण होत आहे.