शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचे भाग्य उजळले !

By admin | Updated: December 8, 2014 02:35 IST

विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच ७५ टक्के आर्थिक गुंतवणूक झाली आहे, असे प्रकल्प कालबद्ध कार्यक्रम आखून येत्या दोन वर्षांत पूर्ण करावेत,

अतुल कुलकर्णी, मुंबईविदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच ७५ टक्के आर्थिक गुंतवणूक झाली आहे, असे प्रकल्प कालबद्ध कार्यक्रम आखून येत्या दोन वर्षांत पूर्ण करावेत, यासाठी लागणाऱ्या मान्यता व इतर बाबींची पूर्तता तत्काळ करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.‘सब घोडे बारा टका’ असे न करता ७५ टक्के काम पूर्ण झालेल्या प्रकल्पांना आधी पूर्ण करण्याचे राजकीय धाडस दाखवा, असे आवाहन करीत ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला होता. याविषयीची विस्तृत आकडेवारीही ‘लोकमत’ने सातत्याने प्रकाशित केली होती. मात्र केवळ विदर्भातील प्रकल्पांना हा न्याय न देता राज्यातील सगळ्याच प्रलंबित प्रकल्पांना हा निकष लावला, तरच राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामास गती मिळेल अन्यथा अन्य विभागांतील प्रकल्पांचा अनुशेष वाढत जाईल, असे या विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.विदभार्तील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. जलसंपदा प्रकल्प व सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ला या वेळी उपस्थित होते. कृती कार्यक्रम काय असावा, याबाबत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, की पाटबंधारे प्रकल्पांना लागणारी सुधारित प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया जलद करण्यात यावी तसेच वनजमिनींची मान्यता, भूसंपादन, जमिनीचे हस्तांतरण, उपलब्ध निधीचा वापर प्राथम्यक्रमाच्या प्रकल्पांवर करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात याव्यात व आवश्यक त्या ठिकाणी अधिकारांचे विकेंद्रीकरण करून क्षेत्रीय स्तरावर हे अधिकार हस्तांतरीत करावेत. यामुळे निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब टळून प्रकल्प पूर्ण होण्यास वेळही कमी होईल.