शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील सफेद मुसळी, अश्‍वगंधा लागवडीवर भर!

By admin | Updated: March 7, 2017 02:32 IST

केंद्र शासनाची योजना, फलोत्पादन औषध वनस्पती मंडळाचे अर्थसहाय्य.

अकोला, दि. ६- पारंपरिक शेतीसोबतच अधिक उत्पादन व उत्पन्न देणार्‍या पिकांकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असून, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही शेतकर्‍यांना औषध वनस्पती व इतर पर्यायी पिके घेण्यासाठीचे प्रबोधन सुरू केले आहे. सफेद मुसळी आणि अश्‍वगंधा यासारख्या औषध पिकांची वाढती मागणी बघता, कृषी विद्यापीठाच्यावतीने ही पिके घेण्यासाठी विदर्भातील शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिक व तंत्रज्ञान समजावून सांगितले जात आहे.केंद्र शासनाने ३६५ दिवस औषध वनस्पती प्रचार व प्रसार करण्यासाठी चालू वर्षात योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषध वनस्पती मंडळाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जून वनौषध उद्यान विभागाला अर्थसहाय्य उपलब्ध केले आहे. याच अर्थसहाय्यातून शेतकर्‍यांना वनौषधीचे प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिक व तंत्रज्ञान समजावून सांगितले जात आहे. विदर्भातील अकोलासह इतर जिल्हय़ात हे तंत्रज्ञान समजावून सांगितले जात असून, अकोला जिल्हय़ातील अकोट तालुक्यातील बोर्डी येथील शेतकरी संजय धर्मे यांनी तूर या पिकात सफेद मुसळीचे आंतरपीक घेतले आहे. सफेद मुसळीचे कंद जमिनीतून काढून त्यावर करावयाच्या प्राथमिक प्रक्रियाचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना दाखवण्यात आले. तज्ज्ञांनी शेतकर्‍यांना पेरणीचे तंत्रज्ञान समजावून सांगितले आहे. गडचिरोली जिल्हय़ातील साखरा येथील शेतकर्‍यांना अश्‍वगंधा लागवडीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. नामदेव उंदिरवाडे यांच्या शेतातील अश्‍वगंधाच्या मुळा जमिनीतून काढून त्यावर करावयाच्या प्रक्रियांचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना समजावून सांगण्यात आले. नागार्जून वनौषध वनस्पती उद्यानात साडेपाचशेच्यावर औषध वनस्पतीच्या रोपांचे जतन करण्यात आले आहे. येथेही शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सुगंधी वनौषध तसेच तिखाडी तेल निर्मितीचे प्रात्यक्षिक येथे दाखविण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी प्रशिक्षण घेऊन तिखाडी प्रकल्प सुरू केला आहे.- विदर्भातील शेतकर्‍यांना तिखाडी तेल, अश्‍वगंधासह इतर औषध वनस्पतीचे तंत्रज्ञान समजावून सांगितले जात आहे. येथून प्रशिक्षण, माहिती घेऊन शेतकर्‍यांनी तिखाडी तेलाचा प्रकल्प सुरू केला आहे.- डॉ. संजय वानखडे,सहयोगी संशोधन संचालक,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.