शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पीडितांना आनंद !

By admin | Updated: July 30, 2015 01:33 IST

याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी डेथ वॉरंट

नवी दिल्ली : याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी डेथ वॉरंट जारी करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे मुंबई बॉम्बस्फोट पीडितांनी २२ वर्षांनंतर न्याय मिळाल्याची भावना व आनंद व्यक्त केला.सर्वोच्च न्यायालयाने याकूबची डेथ वॉरंटला आव्हान देणारी याचिका बुधवारी दुपारी फेटाळल्यानंतर काही मिनिटांतच प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात न्याय दिला गेला नाही. योग्य प्रक्रियेचा अवलंब करण्यात सर्वोच्च न्यायालयाला अपयश आले, असे त्या म्हणाल्या.देशाच्या गुन्हेगारीसंबंधी प्रशासनाच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. संपूर्ण कुटुंबाला घेऊन भारतात परतणाऱ्या, सोबत पुरावे आणणाऱ्या आणि तपासाला मदत करणाऱ्या व्यक्तीला फासावर लटकविले जात आहे, असे वकील सतीश मानशिंदे यांनी नमूद केले. कायदेशीर संघर्षावरील पडदा दूर सारला गेला आहे. गेल्या २२ वर्षांपासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत होतो. सरकारने सुरक्षितता प्रदान केल्याची आमची भावना आहे. बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य कटकर्ते दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यालाही शिक्षा ठोठावली जावी, असे पीडित तुषार देशमुख यांनी म्हटले. तुषार यांची माता बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडली होती. याकूबने सर्व कायदेशीर मार्ग अवलंबल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याला सर्व मार्ग अवलंबण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. अखेरच्या दिवशी आणखी किती याचिका दाखल होणार, याचा सर्व विचार करून याकूबची याचिका रद्द करण्यात आलेली आहे, असे माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी स्पष्ट केले. आता फाशी रोखली जाऊ शकत नाही. याकूबने राष्ट्रपतींकडे पाठविलेल्या दया याचिकेवर काय निर्णय होतो, याची प्रतीक्षा करू या, असे ज्येष्ठ वकील केटीएस तुलसी यांनी म्हटले. राष्ट्रपतींनी दया याचिकेवर दुसऱ्यांदा निर्णय घेतल्यानंतर कायदा आपला मार्ग अवलंबेल, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नमूद केले.