शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

By admin | Updated: July 27, 2016 17:09 IST

प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणीच्या वडिलांसह त्यांच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता आर.आर.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ : प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणीच्या वडिलांसह त्यांच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता आर.आर.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. यावेळी पाचशे ते सातशे जणांचा जमाव जमल्याने पोलिसांनी धाव घेत तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवले. दोघांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले, समाजात नामुश्की नको म्हणून दोघांनीही तक्रार दिली नाही, मात्र तरुणाला समज देऊन सोडून देण्यात आले.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलीजवळ गेल्या तीन दिवसापासून मोबाईल होता. तो मोबाईल बुधवारी तिच्या पालकांच्या नजरेस पडला. त्याबाबत तिला जाब विचारला असता तिने एका तरुणाचे नाव सांगितले. त्यानेच हा मोबाईल दिल्याचे सांगितले, मात्र तो मैत्रिणीसाठी दिल्याचेही तरुणीने सांगितले. मोबाईल प्रकरणामुळे पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी संबंधित तरुणाला आर.आर.शाळेजवळ गाठले. शाळा सुटण्याची वेळ असल्याने विद्यार्थी व पालकांची प्रचंड गर्दी झाली होती.

मुलीला त्रास देतो या कारणावरुन तिच्या वडिलांनी त्याची यथेच्छ धुलाई केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला. संतापात काहीही घडना घडू शकते याचा अंदाज आल्याने काही लोकांनी तरुणाला सोडविण्याचा प्रयत्न केला तर काहींनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. पोलिसांनीही लागलीच घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले. आपसात समझोता करून वाद मिटवण्यात आला.