शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पीडित मुलगी चार महिन्यांची गरोदर

By admin | Updated: June 23, 2016 21:50 IST

फुलंब्री तालुक्यातील धनसी वस्तीवरील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ९ जणांनी बलात्कार केला.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 23 - फुलंब्री तालुक्यातील धनसी वस्तीवरील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ९ जणांनी बलात्कार केला. सदर मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर सदर घटनेला वाचा फुटली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनेबाबत सहायक पोलीस निरीक्षक नरहरी शिंदे यांनी सांगितले की, २६ जानेवारी २०१६ रोजी सदर फिर्यादी मुलगी धनसी वस्तीवरील आपल्या राहत्या घरात झोपलेली असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याच वस्तीवरील चार जण तिथे आले. त्यांनी बळजबरीने तिचे हात धरून तिला उचलून शेजारच्या शेतकरी शेख सांडू यांच्या कपाशीच्या शेतात नेले. यावेळी चारही जणांनी आळीपाळीने तिच्यावर अतिप्रसंग केला. घटनेच्या एक महिन्यानंतर गावातील इतर दोन जणांनी तिच्यावर बलात्कार केला; परंतु या घटनेची कुठेही वाच्यता झाली नाही. यादरम्यान सदर मुलगी पाल (ता. फुलंब्री) येथे आपल्या मावशीकडे गेलेली असताना त्या ठिकाणी एकाने तिच्यावर अतिप्रसंग केला. सदर मुलीने झालेली हकिकत आपल्या मावशीला सांगीतल्यानंतर त्याला गावातच मारहाण करण्यात आल्याने प्रकरण मिटले. त्यानंतर सदर पीडिता पुन्हा आपल्या गावी आल्यानंतर एकाने तिच्यावर बलात्कार के ला. बुधवारी सदर मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला डॉक्टरकडे नेले असता तिला दिवस गेल्याचे उघड झाले. त्यांनी तात्काळ वडोदबाजार पोलीस ठाणे गाठून झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना सांगितली. सुरुवातीला एका आरोपीचे नाव समोर आले; परंतु पोलीस तपासात एक-एक करीत नऊ आरोपी असल्याचे उघड झाले.पोलिसांनी रात्रीच सात आरोपींना अटक केली, तर वासडी येथील आरोपीस गुरुवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आणखी आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी आरोपी शेख अमजद शेख इरफान, शेख आसीफ शेख सांडू, शेख करीम शेख हमीद, शेख अफसर शेख यासीन, शेख लतीप शेख सादिक, शेख साबेर शेख शेख शमीम, शेख अमीन शेख सांडू, (सर्व रा. धनस वस्ती, ता. फुलंब्री), शेख इम्रान (रा. पाल, ता. फुलंब्री) व शेख समीर (रा. वासडी, ता. कन्नड) यांच्या विरुद्ध कमल ३७६ (५), ५०६ भा.दं.वि. व कलम ३ (अ) /४ प्रमाणे बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांर्तगत पोलिसांनी वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरहरी शिंदे पुढील तपास करीत आहेत.