शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विधी विद्यापीठाला कुलगुरू

By admin | Updated: December 18, 2015 00:52 IST

मुंबई व औरंगाबाद येथील महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटीच्या पहिल्या कुलगुरूंची लवकरच नियुक्ती केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत

नागपूर : मुंबई व औरंगाबाद येथील महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटीच्या पहिल्या कुलगुरूंची लवकरच नियुक्ती केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत नियम ९३ अन्वयेवरील सूचनेच्या उत्तरात दिली. मुंबई व औरंगाबाद येथील महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यासाठी योग्य व्यक्तींची शिफारस करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना केली होती. त्यानुसार सरन्यायाधीशांनी मुंबई येथील लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू पदासाठी प्रा. बी.पी. पांडा यांची शिफारस केली आहे. औरंगाबाद येथील लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू पदासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली. औरंगाबाद लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी सरन्यायाधीश यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शोध समितीचे अध्यक्ष यांना कळविण्यात आले आहे. नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी कुलगुरूंच्या वयोमर्यादेमध्ये सुधारणा व या पदासाठीची पात्रता यासंदर्भात महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी अ‍ॅक्टमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा, यासंबंधीचा ठराव पारित केला आहे. यासंदर्भात विद्यापीठ स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु हा प्रस्ताव अद्याप शासनाला प्राप्त झाला नसल्याची माहिती तावडे यांनी दिली. सदस्य सतीश चव्हाण यांनी नियम ९३ अन्वये ही सूचना मांडली होती. (प्रतिनिधी)