शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे निधन

By admin | Updated: September 2, 2016 06:29 IST

ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. काही महिन्यांपासून ते नानावटी रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत होते.

मुंबई : ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. काही महिन्यांपासून ते नानावटी रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत होते. राव यांच्या पश्चात मुलगा शशांक, मुलगी शिल्पा आणि नातवंडे असा परिवार आहे. कामगार क्षेत्रातील अनेक संघटित आणि असंघटित कामगारांच्या संघटनांचे नेतृत्व राव करत होते. म्युनिसिपल मजदूर युनियन, बॉम्बे लेबर युनियन, हॉकर्स युनियन, रिक्षामेन्स युनियन आदी संघटनांमार्फत ते महापालिका कर्मचारी, फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक, बेस्ट कर्मचारी व कामगार अशा विविध कामगारांच्या संघटनांचे नेतृत्व करताना राव यांनी रस्त्यावर उतरून हजारो आंदोलने केली. दिवंगत कामगार नेते दत्ता सामंत यांच्यानंतर एकमेव लढवय्ये नेतृत्व म्हणून राव यांची ओळख होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या चळवळीतून तयार झालेले शरद राव हे देश आणि विदेश पातळीवरील कामगार संघटनांचेही पदाधिकारी होते. त्यांच्या जाण्याने उभ्या कामगार विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.शशांक राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा कॅनडाला वास्तव्यास असून शनिवारी, ३ सप्टेंबर रोजी सकाळी त्या मुंबईत येतील. तोपर्यंत पार्थिव शीतगृहात ठेवण्यात येणार आहे. शनिवारी शिल्पा आल्यानंतर सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत राव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. गोरेगावातील लिंक रोडशेजारील बांगुरनगरमधील जलनिधी सोसायटी येथील राहत्या घरापासूनच अंत्ययात्रेला सुरुवात होईल. दुपारी ओशिवरा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. (प्रतिनिधी)कामगार चळवळीचे मोठे नुकसानशरद राव यांच्या निधनाने संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे संघर्षशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. ते आपल्या संदेशात म्हणतात : कामगार-कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवित त्यांनी कामगारांचे प्रश्न व्यापक व्यासपीठावर मांडले. कामगारांच्या हिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणाऱ्या राव यांच्या निधनाने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.