शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचोरीची तक्रार होणार आॅनलाइन !

By admin | Updated: May 29, 2016 00:37 IST

राज्यभरात वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अद्ययावत पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता घटनास्थळावरूनच वाहनचोरीची तक्रार घेवून काही मिनिटांत

- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई

राज्यभरात वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अद्ययावत पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता घटनास्थळावरूनच वाहनचोरीची तक्रार घेवून काही मिनिटांत पोलिसांकडून वाहनाचा शोध घेण्याला सुरवात होणार आहे. याकरिता विविध सुविधा उपलब्ध असलेले मोबाइल अ‍ॅप्लीकेशन बनवण्याची प्रक्रिया राज्य पोलिसांकडून सुरू असून येत्या काही दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असणाऱ्या टोळ्या राज्यभरातून वाहनचोरी करत आहेत. दुचाकीसह ट्रक, टेंपो व कंटेनर चोरी करुन ते राज्यातच किंवा इतर राज्यात विकले जात आहेत. त्यानुसार राज्यभरात चोरी होणाऱ्या वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असून अवघ्या नवी मुंबई आयुक्तालयातूनच प्रतिवर्षी सुमारे ५०० ते ६०० वाहने चोरीला जात आहेत, तर मागील सहा वर्षांत सुमारे साडेपाच हजार छोटी-मोठी वाहने नवी मुंबईतून चोरीला गेलेली आहेत. त्यापैकी सुमारे बाराशे वाहनांचा तपास पोलिसांना लागू शकलेला आहे.वाहनचोरीला आळा घालण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी अनेक टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. परंतु शहरातल्या किंवा शहराबाहेरील सराईत टोळ्यांबरोबरच अंतरराष्ट्रीय वाहनचोर टोळ्यांचे देखील मोठे आव्हान राज्य पोलिसांपुढे आहे.एका राज्यातली चोरीची वाहने दुसऱ्या राज्यात विकणे, तसेच चोरीच्या वाहनांचे सुटे भाग करुन ते विकणाऱ्या अनेक टोळ्या राज्यात सक्रिय आहेत. या टोळ्या राज्यातून वर्षाला हजारो छोटी-मोठी वाहने चोरत आहेत. अशाच एका टोळीला एपीएमसी पोलिसांनी धुळे येथून अटक देखील केलेली आहे. राज्यभरातील चोरीच्या ट्रकची विल्हेवाट लावून त्याचे उपयोगी भाग मुंबई व नवी मुंबई परिसरात ते विकत होते. अशा टोळ्यांच्या मुसक्या आवळून वाहनचोरीच्या घटनांची उकल करण्यासाठी राज्य पोलिसांकडून मोबाइल अ‍ॅप्लीकेशन तयार करण्याचे काम सुरू आहे. अनेकदा एका पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या चोरीच्या वाहनाची माहिती दुसऱ्या पोलीस ठाण्यातील पोलिसांना नसते. परिणामी चोरीचे वाहन बेवारस म्हणून पडलेले असतानाही त्याचा छडा लागत नाही. मात्र या अ‍ॅप्लीकेशनमुळे यापुढे बेवारस वाहनांचाही उलगडा पोलीस करू शकणार आहेत. ही प्रक्रिया अधिक सक्षमतेने राबविण्यासाठी गुन्हे शाखेअंतर्गत विशेष तपास पथक कार्यरत करण्यात आले आहे.