शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

भाज्या स्वस्त होणार!

By admin | Updated: August 18, 2014 00:37 IST

सध्या बाजारात नागपूरलगतच्या उत्पादकांकडून भाज्यांची आवक वाढल्याने गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणात भाज्या स्वस्त होण्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत

स्थानिकांची आवक वाढली : टमाटर, मिरचीच्या किमतीत घटनागपूर : सध्या बाजारात नागपूरलगतच्या उत्पादकांकडून भाज्यांची आवक वाढल्याने गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणात भाज्या स्वस्त होण्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रविवारी भाज्या स्वस्तात उपलब्ध झाल्याने गृहिणींमध्ये उत्साह आहे. महागाईत थोडीफार का होईना, गृहिणींच्या बचतीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांआधी प्रति किलो १०० रुपयांवर गेलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे भाव सध्या अर्ध्यांपेक्षा कमी आहेत. टमाटर, फुलकोबी, पत्ताकोबी, वांगे, भेंडी, पालक, कोहळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. स्थानिक उत्पादकांसह बाहेरून येणाऱ्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव कमी झाल्याची माहिती कॉटन मार्केट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली. भाज्यांची मुबलक आवकगेल्यावर्षी याच काळात जास्त पावसामुळे भाज्या खराब झाल्याने महागल्या होत्या. सणांमध्ये किरकोळ बाजारात बहुतांश भाज्यांचे दर ५० ते ७० रुपये किलो होते. या कारणाने सण साजरे करणारे नको ही महागाई असेच म्हणत होते. पण यंदा स्थिती वेगळी आहे. यावेळी पाऊस पडला, पण उघाडही दिल्याने भाज्यांच्या पिकाला फटका बसला नाही, शिवाय कीडही पडली नाही. भाज्या मुबलक प्रमाणात बाजारात येण्याचे हे मुख्य कारण आहे. उत्पादन आणि वाहतुकीचा खर्च पाहता बाहेरून येणारा माल तसा महागच असतो. किरकोळमध्ये काही भाज्या वगळता बहुतांश स्वस्त आहेत. कॉटन मार्केट ठोक बाजारात टमाटर नारायणगाव, मदनफल्ली, संगमनेर व नाशिकहून येत आहे. गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, छिंदवाडा व औरंगाबाद येथून फुलकोबी आणि परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून हिरवी मिरचीची आवक आहे. नागपूरलगतहून चवळी भाजी, पालक, भेंडी, कारल्याची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्या येत आहेत. कांदे उतरले, बटाटे महागचसध्या कांद्याला मागणी कमी असल्याने भाव आटोक्यात आहेत, तर भाज्यांच्या किमतीमुळे बटाट्याला मागणी वाढली आहे. कळमना ठोक बाजारात भाव प्रति किलो २५ रुपयांवर आहे. कळमन्यात लाल आणि पांढरा कांद्याची आवक वाढली आहे. पांढरे आणि लाल कांदे ७०० ते ७२५ रुपये मण (४० किलो) आहेत. अमरावती आणि अकोला येथून पांढरा तर बुलडाणा येथून लाल कांद्याची आवक आहे. थोडेफार ट्रक नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून येत आहेत. श्रावणात कांद्याची विक्री कमी असल्याने दरही कमी असतात. तीन आठवड्याआधी भाव १००० रुपयांवर होते. नवीन कांदा बाजारात आल्यानंतर दर कमी होण्याचे शक्यता असल्याची माहिती कळमना बाजारातील आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी दिली. (प्रतिनिधी)