शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याचे दर घसरले, भेंडी, कोबी ५ रुपये किलो

By admin | Updated: August 31, 2016 07:31 IST

शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला नियमनमुक्त केला. परंतु प्रत्यक्षात बाजारभाव वाढण्याऐवजी प्रचंड घसरले आहेत.

नामदेव मोरे , नवी मुंबईशेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला नियमनमुक्त केला. परंतु प्रत्यक्षात बाजारभाव वाढण्याऐवजी प्रचंड घसरले आहेत. दोन महिन्यांत टोमॅटोचे दर १० पट तर भेंडीचे दर ८ पट कमी झाले आहेत. भाजीपाला विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत. प्रत्येक वर्षी आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळत असतो. चांगला बाजारभाव मिळावा यासाठी अनेक शेतकरी मार्चपासून कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतात. परंतु या वर्षी अचानक आॅगस्टमध्ये भाव कोसळले आहेत. राज्यातील बहुतांश सर्व होलसेल मार्केटमध्ये कांदा २ ते ८ रुपये किलो दराने विकला जात आहे. काही ठिकाणी १ रुपया किलो दरानेही कांदा विकला जात आहे. कांद्यापाठोपाठ इतर भाज्यांचे भावही शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी काढू लागले आहेत. जूनमध्ये मुंबई एपीएमसीमध्ये भेंडी ४० ते ४४ रुपये किलो दराने विकली जात होती. सद्य:स्थितीत हे दर ५ ते १२ रुपये झाले आहेत. १६ ते २० रुपयांचा कोबी ४ ते ६ रुपयांना विकला जात असून, टोमॅटो ४० रुपयांवरून ४ रुपये किलो झाले आहेत. राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये अशीच स्थिती आहे. कोल्हापूरमध्ये कोबी ३ ते ६ व टोमॅटो २ ते ६ रुपये किलो दराने विकला जात आहे. दोन महिन्यांत ८ ते १० पट भाव घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईमध्ये विक्रीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांना विक्रीतून उत्पादनासाठी लागलेला खर्चही मिळेनासा झालेला आहे. दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात पाव किलो भाजी घेण्यासाठी २० ते २५ रुपये मोजावे लागत होते. परंतु आता शेतकऱ्यांना एक किलो भाजीसाठीही तेवढे पैसे मिळत नाहीत. १५ रुपये किलोपेक्षा जास्त भाव मिळत नाही.