शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला दूधकोंडी

By admin | Updated: June 3, 2017 02:09 IST

शेतकरी संपामुळे पिशवीबंद दूध पुरवठा निम्म्याने घटल्याने पुणे शहरात शुक्रवारी दूधकोंडीची स्थिती निर्माण झाली. शनिवारपासून

पुणे : शेतकरी संपामुळे पिशवीबंद दूध पुरवठा निम्म्याने घटल्याने पुणे शहरात शुक्रवारी दूधकोंडीची स्थिती निर्माण झाली. शनिवारपासून दूधटंचाईची तीव्रता आणखी वाढले असा अंदाज शहरातील प्रमुख दूध वितरकांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या ठिकठिकाणच्या आंदोलनामुळे दूध संकलनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. या शिवाय काही महत्त्वाच्या पिशवीबंद दूध कंपन्यांकडूनदेखील दुधाचा पुरवठा शुक्रवारी कमी झाला. परिणामी ४० ते ५० टक्के दूधपुरवठा घटला. शहरात साधारण दररोज १५ लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. नगर, शिरुर, जुन्नर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि शहर हद्दीलगतच्या गावांमधून संकलित केलेले दूध येथे प्रामुख्याने येते. त्यात जवळपास दहा लाख लिटर दूध पिशवीबंद येते. तर, सुमारे ५ लाख लिटर दुधाचा पुरवठा हा गवळ्यांमार्फत होतो. गवळी या संपात सहभागी नसल्याने काहीसा दूध पुरवठा सुरळीत आहे. पिशवीबंद दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला आहे. या बाबत माहिती देताना पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज) व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, कात्रज डेअरीत दररोज २ लाख २५ हजार लिटर दुधाची आवक होते. शुक्रवारी केवळ १ लाख ३५ हजार लिटर दूध आले. डेअरीमध्ये जवळपास २ लाख लिटर दुधाचा साठा असतो. त्यामुळे शुक्रवारी फारसा परिणाम जाणवला नाही. शनिवारपासून त्याची तीव्रता वाढेल. त्यामुळे संपकाळात दुधाचे इतर उपपदार्थ न करता केवळ दूध वितरण करण्यात येईल. या शिवाय कात्रज डेअरीतील एक वितरण केंद्र २४ तास सुरु ठेवण्यात येईल. गणेशपेठ दूध खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे म्हणाले, मावळ, मुळशी आणि वेल्हा भागातून दूध आले नाही. शहर हद्दीलगतच्या पंधरा-वीस किलोमीटर हद्दीतील दूध शुक्रवारी आले. त्यामुळे दररोजचे दूध संकलन ८ हजार लिटरवरून ३ हजार लिटरपर्यंत खाली घसरले होते. परिणामी दुधाच्या दरात प्रतिलिटर ६० वरुन ७० रुपयापर्यंत वाढ झाली. 50% दूधपुरवठा घटला शहरात दररोज १५ लाख लिटर दुधाची आवक होते. त्यातील दहा लाख लिटर दूध विविध कंपन्यांमार्फत वितरित होते. गवळ्यांमार्फत वितरित होणाऱ्या दुधावर फारसा परिणाम झाला नाही.- विवेक क्षीरसागर, व्यवस्थापकीय संचालक, कात्रज दूधसोनाई दूध संघात दूध संकलन झाले नाही. सोनाई उद्योग समूहाने शेतकऱ्यांच्या मागणीला आज पाठिंबा दिला आहे. इंदापूरचा येत्या रविवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.१८ लाख लिटर सोनाईचे दररोजचे दूध संकलन १८ लाख लिटर आहे. ढोबळमानाने दररोजच्या दूध संकलनामधून सोनाई १५० टन दूध भुकटी व ६० टन बटर बनवते.