शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जुन्नरच्या शेतातील भाजी थेट शहरात

By admin | Updated: July 21, 2016 04:01 IST

पाले व फळभाज्यांच्या दरांनी शंभरी ओलांडल्याने गृहिणींचे बजेटच कोलमडले आहे.

डोंबिवली : पाले व फळभाज्यांच्या दरांनी शंभरी ओलांडल्याने गृहिणींचे बजेटच कोलमडले आहे. पण, सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला थेट बाजारात विकण्याची परवानगी दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. ‘शेतकरी आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ५ जुलैपासून जुन्नर येथील शेतकरी त्यांच्या शेतातील ताजी भाजी पूर्वेतील सूतिकागृहाजवळ विक्रीसाठी आणत आहेत. ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची विशेषत: गृहिणींची गर्दी होत आहे.जुन्नर तालुक्यातील सुरेश गायकवाड व त्यांचे सहकारी हे त्यांच्या शेतात पिकणारा दीड टन भाजीपाला विक्रीसाठी घेऊन आले आहेत. काही शेतकऱ्यांनी मिळून ‘ब्रह्मानंद शेतकरी बचत गट’ तयार केला आहे. एका गटात प्रत्येक गावातील १० शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी दरमहा १०० रुपये वर्गणी काढतो. त्यातून भाजीपाला वाहतुकीचा खर्च भागवला जातो. एकाच शेतकऱ्यावर मालवाहतुकीचा भार येत नाही. या शेतकऱ्यांना ‘जुन्नर तालुका फार्म शेतकरी कंपनी’तर्फे बी बियाणे पुरवली जातात. भाजीपाला पिकवणारा शेतकरी हा बागायतदार आहे. बागायती ही कष्टाची शेती आहे. पिकासाठी शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते. त्याचा माल विकला न गेल्यास कर्ज फेडण्याच्या अडचणी त्याच्यासमोर उभ्या ठाकतात.गायकवाड यांनी सांगितले की, ‘दोन वर्षांपूर्वी आम्ही कल्याणमधील ग्राहकाला आमच्या शेतातील माल थेट विकला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तो अनुभव आमच्या गाठीशी आहे. हंगामानुसार भाजीपाल्याचा भाव कमीजास्त ठरतो. आमच्याच शेतातील माल आम्ही स्वत: विकत असल्याने दलालीचे पैसे वाचतात. तसेच दलाल नसल्याने आमच्या मालाला चांगला भाव मिळत आहे.’शेतकऱ्यांसाठी सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या ‘शॉप फॉर चेंज फेअर ट्रेण्ड’ने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे समीर आठवले यांनी सांगितले की, ‘शेतकऱ्यांचा माल दलालाशिवाय थेट विकला जावा. त्याला योग्य भाव मिळावा, हाच हेतू आमच्या संस्थेचा आहे. शेतकऱ्याला नफा व ग्राहकाला कमी दरात भाजीपाला, असा दुहेरी उद्देश त्यातून साध्य होत आहे. जुन्नर तालुक्यातील ३० ते ४० शेतकऱ्यांची नियमनमुक्ती केली जात नव्हती. त्याकरिता, संस्थेने पुढाकार घेतला. शेतकरी त्याचा दर ठरवून त्याचा भाजीपाला विकत आहे. दर ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याला या उपक्रमातून मिळत आहे. उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आहे. अन्य बचत गटांना त्यात सामावून घेण्यात येणार आहे.’ भाजी घेण्यासाठी आलेल्या प्रतिभा सोमण यांनी सांगितले की, ‘चांगली भाजी कमी किमतीत मिळते. तसेच गावाकडची ताजी भाजी असल्याने या उपक्रमामुळे नाल्यावर पिकवल्या जाणाऱ्या भाजीला आळा बसण्यास मदत होईल.’ (प्रतिनिधी)