शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

मार्केट बंदमुळे भाजीपाला कडाडला

By admin | Updated: June 5, 2014 22:49 IST

बेमुदत बंद पुकारल्याने भाजीपाल्याची टंचाई जाणवू लागली आहे. परिणामी किरकोळ बाजारातील सर्वच पालेभाज्या व फळभाज्यांच्या भावात दुप्पट ते तिप्पटीने वाढ झाली आहे.

आडते असोसिएशनचा बंद सुरुच, पुणेकरांवर भाजी संकट पुणे : टोळी प्रश्नावरुन श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने बेमुदत बंद पुकारल्याने भाजीपाल्याची टंचाई जाणवू लागली आहे. परिणामी किरकोळ बाजारातील सर्वच पालेभाज्या व फळभाज्यांच्या भावात दुप्पट ते तिप्पटीने वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात अगदी १५ ते २० रुपयादरम्यान मिळणार्‍या बटाट्याचे भाव चाळीस रुपयांवर, तर वीस रुपयांवर मिळणारी सिमला मिरची ८० रुपये किलोवर पोचली आहे. घेवड्याचा प्रतिकिलोचा भाव तर १२० रुपयांवर गेला आहे. पालेभाज्यांच्या एका जुडीचा भावही २० रुपयांच्या पुढेच आहे. टोळी पद्धत रद्द करावी या मागणीसाठी आडते असोसिएशनने बुधवारपासुन बेमुदत बाजारपेठ बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यापुर्वी एक जुन पासून कांदा-बटाटा विभाग बंद होता. त्याचा एकत्रित परिणाम आता किरकोळ बाजारात दिसून येत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर पणन संचालकांनी प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती व मांजरी बाजारात सकाळी सहा ते दहा या वेळेत विक्री व्यवस्था सुरु केली आहे. गुलटेकडी मार्केट यार्डात शेतकर्‍यांनी २ हजार क्विंटल भाजीपाला आणला, असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. मात्र मागणीच्या तुलनेत आवक अगदीच किरकोळ आहे. या बाबत माहिती देताना किरकोळ भाजी विक्रेते सचिन काळे म्हणाले, पुणे बाजारात अगदी किरकोळ आवक होत आहे. त्यामुळे तेथेच चढ्या भावाने भाजीपाल्याची विक्री होत आहे. परिणामी किरकोळ विक्रेते शेतकरी अथवा मांजरी बाजारातून भाजी विकत घेत आहेत. परिणामी भाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातील भाज्यांचे प्रतिकिलो भाव (कंसात गेल्या आठवड्यातील भाव) : कांदा २८-३० (१५-१६), बटाटा ३०-३५ (२०-२२), कोबी ३५ (१४-१५), फ्लॉवर ५५ (२५), हिरवी मिरची ४० (२०-२२), काकडी ४५ (२२), सिमला मिरची ८० (२२), घेवडा १२० (३५-५०). पालेभाज्यांचे एका जुडीचे भाव : मेथी २५ (१०), कोथिंबीर २५ (१०), पालक २० (७-८), मुळा २५-३० (१२-१४).