शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी वसईकर रस्त्यावर

By admin | Updated: October 3, 2016 03:26 IST

वसईकर रविवारी सकाळी झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वसई : वसई विरार पालिकेने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वसईकर रविवारी सकाळी झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वसईचे रस्ते आणि गल्लीबोळात उत्साहाने स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.पालिकेने १५ आॅक्टोबरपर्यंत शहरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. शहरातील रस्ते, गल्ल्या, इमारतींचे आवार स्वच्छ करण्यासाठी शेकडो नागरीक झाडू घेऊन उतरले होते. नगरसेवक, अधिकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीत रविवारी सकाळपासून दुपारपर्यंत स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. १०६ ठिकाणी प्रत्येक वॉर्डात शंभरहून अधिक नागरीकांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन श्रमदान केले. महापौर प्रविणा ठाकूर, आयुक्त सतीश लोखंडे, माजी महापौर नारायण मानकर यांनी नवघर-माणिकपूर स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता. वसई विरार परिसरात काही ठिकाणी स्वच्छता मोहिमेची जनजागृती करण्यासाठी दिंंडीही काढण्यात आली. यावेळी पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. १५ आॅक्टोबरपर्यंत चालणारी ही स्वच्छता मोहिमेत तलाव, उद्यान, समुद्रकिनारे, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल परिसरासह सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये राबवण्यात येणार आहे. दरम्यान, स्वच्छतेसंबंधी असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वसई विरार पालिकेने स्वच्छता अ‍ॅप सुरु केले आहे. (प्रतिनिधी)