शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा बँकेच्या सुनावणीला मुहूत

By admin | Updated: February 13, 2015 23:23 IST

१०७ जणांना नोटिसा : कलम ८८ खाली जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया; ७ मार्चला सुरुवार्त

सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या १७३ कोटी रुपयांच्या नुकसानीप्रकरणी सहकार अधिनियम कलम ८८ खाली संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया शुक्रवारी सुरू झाली. याबाबत ३४ संचालक व ७३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संचालक व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यावर ७ मार्चला सुनावणी होणार आहे.वसंतदादा बँकेत ३१५ कोटींच्या ठेवी असून, ३२० कोटी रुपयांची कर्जे आहेत. यातील २९० कोटींच्या कर्जांची थकबाकी आहे. बँकेच्या राज्यात ३६ शाखा आहेत. बँकेचे ११ जानेवारी २००८ मध्ये झालेल्या विशेष लेखापरीक्षणात अनेक आक्षेप नोंदविण्यात आले. २६ जून २००८ रोजी रिझर्व्ह बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यानंतर ७ जानेवारी २००९ रोजी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीबरोबरच शहरातील नागरी सहकारी पतसंस्थांच्या मोठ्या प्रमाणावर ठेवी अडकल्या आहेत. याच लेखापरीक्षणाच्या आधारे महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशी सुरू झाल्यानंतर बँकेच्या संचालकांनी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे धाव घेतली. सहकारमंत्र्यांनी कलम ८८ खालील चौकशीला स्थगिती दिली होती. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर बँकेच्या चौकशीबाबत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यावर सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात सुनावणी झाली. सुनावणीवेळी बँकेच्या माजी संचालकांनी म्हणणे सादर करण्यास मुदतवाढ मागितली होती. त्यांची मागणी फेटाळून लावत सहकारमंत्र्यांनी तातडीने म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. माजी संचालकांचे म्हणणे सादर झाल्यानंतर ते फेटाळून लावत सहकारमंत्र्यांनी चौकशीची स्थगिती उठविली होती. बँकेच्या संचालक व कर्मचाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चितीसाठी अ‍ॅड. आर. डी. रैनाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिन्याभराने चौकशी अधिकाऱ्यांनी जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया हाती घेतली आहे. आज बँकेच्या ३४ माजी संचालक व ७३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना नव्याने नोटिसा बजावून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहे. यावर ७ मार्चला सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)