शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाइन डेसाठी आजी-आजोबांनी केली एकत्र शस्त्रक्रिया

By admin | Updated: February 13, 2017 17:05 IST

गेल्या काही वर्षांपासुन वॅलेंटाईन डे या प्रेम व्यक्त करण्याच्या दिवसाचा ज्वर वाढू लागला आहे. या दिवसाचा अर्थ तरुण मंडळींकडुन वेगळा काढला जात असला तरी या दिवसाला आपली नाती

राजू काळे/ऑनलाइन लोकमत भार्इंदर, दि. 13 - गेल्या काही वर्षांपासुन वॅलेंटाईन डे या प्रेम व्यक्त करण्याच्या दिवसाचा ज्वर वाढू लागला आहे. या दिवसाचा अर्थ तरुण मंडळींकडुन वेगळा काढला जात असला तरी या दिवसाला आपली नाती प्रेमभावनेतुन दृढ करण्याचा दिवस मानणाऱ्यांचा वर्गही अस्तित्वात आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी भार्इंदर येथील एका वृद्ध दांपत्याने गेल्या वर्षभरापासुन त्रस्त असलेल्या पायातील नसांच्या दुखण्यापासुन मुक्त होण्यासाठी वॅलेंटाईन डेच्या १० दिवस अगोदर एकत्रपणे शस्त्रक्रिया करुन घेत हा दिवस साजरा करण्याचा निर्धार केला आहे. प्रेमभंग झाला कि प्रेमी युगुल जीवाचं बरं-वाईट करुन घ्यायला तत्पर होतात. त्यातुनच प्रयत्न झाल्यास त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु, भार्इंदर येथील शैलेश मेहता (५६) व काश्मिरा मेहता (५३) हे वृद्ध दांपत्य त्याला अपवाद ठरले आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करता यावा, यासाठी त्यांनी आपल्या वेदनेवर एकत्रपणे शस्त्रक्रिया करुन घेतल्याने त्यांच्या प्रेमाचे कौतुक केले जात आहे. मेहता दांपत्याला वर्षभरापासुन व्हेरीकोज व्हेन नामक पायांतील नसांच्या आजाराने ग्रासले होते. यात त्यांच्या पायाची हालचाल मंदावल्याने त्यांना घराबाहेर पडण्यासाठी मदतनीसाची आवश्यकता भासे. त्यामुळे मुलांवर अवलंबुन असलेल्या दांपत्याला यंदाच्या वॅलेंटाईन डे मुकण्याची चिंता वाटू लागली. हे दांपत्य आपल्या मुलाबाळांसह कुटुंबातील व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी वॅलेंटाईन डे साजरा करतात. त्यात ते मुलांबरोबर भेटवस्तूची शॉपिंग, सिनेमा व हॉटलमध्ये जेवनाचा बेत आखायचे. परंतु, यंदा पायाच्या दुखण्यामुळे हा दिवस साजरा करण्यापासुन आपण वंचित राहणार कि काय, अशी चिंता त्यांना सतावु लागली. याची कुणकूण त्यांच्या मुलांना लागल्याने त्यांनी मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात आई-वडीलांना उपचारासाठी नेले. तेथील या आजाराचे तज्ञ डॉ. हिमांशू शहा यांनी मेहता दांपत्याला आधुनिक लेजर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्याला मान्यता दिल्यानंतर डॉ. शहा यांनी शैलेश यांच्या पायावरील शस्त्रक्रियेनंतर काश्मिरा यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. परंतु, शैलेश यांनी वॅलेंटाईन डे काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तो आम्हाला साजरा करायचा आहे. त्यामुळे आमच्या दोघांच्या पायांवर एकाचवेळी शस्त्रक्रिया करण्याची विनंती त्यांनी डॉ. शहा यांना केली. मेहता दांपत्याचे एक दुजे के लिए प्रेम पाहता डॉ. शहा यांनी शैलेश यांची विनंती मान्य केली. शैलेश यांच्या दोन्ही तर काश्मिरा यांच्या एका पायावर ४ फेब्रुवारीला यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याने ते यंदाचा वॅलेंटाईन डे आनंदाने साजरा करु शकतील, असे रुग्णालयाचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी यांनी सांगितले. चौकट : या आजाराबाबत माहिती देताना डॉ शहा म्हणाले, या आजारामुळे पायातील अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून गाठीं तयार होतात. त्यामुळे पायांची हालचाल पूर्णपणे मंदावुन रुग्णांना वेदना होतात. हा आजार जीवघेणा नसला तरी त्याची लागण १०० पैकी ९ जणांना होते. सतत उभे राहण्याचे काम, स्थूलता, अनुवांशिकतेसह महिलांना प्रसूतीनंतर आजाराची लागण होते. भारतात बदललेल्या जीवनशैली व आयुर्मानामुळे वृद्धत्व लवकर येते. त्यातुनच वार्धक्याला सुरुवात होते. सध्या यावर आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असल्याने तो आजार बरा होतो. त्यासाठी वेळेत उपचार सुरु करणे आवश्यक आहे.