शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
4
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
5
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
6
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
7
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
8
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
9
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
10
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
11
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
12
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
13
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
14
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती
15
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
16
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
18
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
19
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
20
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित

साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी वझे

By admin | Updated: October 6, 2016 05:04 IST

डोंबिवलीत होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आयोजक आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

डोंबिवली : डोंबिवलीत होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आयोजक आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. बिगर राजकीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने संमेलनावर कोणताही राजकीय शिक्का बसलेला नाही. अर्थात त्यासाठी वेगवेगळ््या मार्गाने प्रयत्न करणारे राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि त्यांच्यासाठी शब्द टाकणारे काही साहित्यिक यांच्या दबावाला बळी न पडता आयोजक संस्थेने ही निवड केली आहे. स्वागताध्यक्ष निवडीचे अधिकार निमंत्रक संस्थेला असल्याने त्यांनी ही निवड बुधवारी अधिकृतपणे घोषित केले. आगरी यूथ फोरमने आगरी महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. गेली १३ वर्षे ते आगरी महोत्सवाचे आयोजन करतात. या महोत्सवातून त्यांनी अनेक ज्ञाती-समाज जोडले आहेत. त्यातच साहित्य संमेलनाच्या आयोजनाची कल्पना समोर आली. ती विचारात घेऊन फोरमने साहित्य संमेलन डोंबिवलीत व्हावे यासाठी यापूर्वी दोन वेळा मागणी केली होती. यंदा पुन्हा पाहणी झाल्यावर डोंबिवलीचे नाव नक्की झाले. संमेलनावर राजकीय किंवा विशिष्ट विचारसरणीचा शिक्का बसू नये म्हणून आयोजकांनी वझेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. संमेलन कसे असावे, त्यात कोणत्या विषयांचा समावेश असावा याबाबत पहिली बैठक रविवारी, ९ आॅक्टोबरला सर्वेश सभागृहात होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली. (प्रतिनिधी)