शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवीचा घात, नव्हे घातपात

By admin | Updated: January 19, 2017 02:06 IST

वैष्णवी लोहट या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अखेर मित्रविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

तळेगाव दाभाडे : येथे २२ डिसेंबर २०१६ रोजी झालेला वैष्णवी लोहट या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अखेर मित्रविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मानवाधिकार संघटनेचा पाठपुरावा व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानंतर पालकांच्या मागणीची दखल घेतली.तळेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारअर्जावरून खुनाच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात आल्याचे सांगितले. आरोपींबाबत माहिती देण्यास मात्र त्यांनी असमर्थता व्यक्त केली.वैष्णवीचे वडील हेमंत लोहट यांनी यापूर्वी तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक यांनी लेखी निवेदन दिले होते. त्याची प्रत पुणे ग्रामीणचे अधीक्षक, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनाही पाठवली होती. त्यानंतरही पोलिसांकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. नगरसेवक किशोर भेगडे, माजी नगराध्यक्षा माया भेगडे यांच्या नेतृत्वाखाली मानवाधिकार संघटनेचे पुणे जिल्हा सरचिटणीस प्रदीप नाईक, तसेच मयूर राजगुरव, रोहन राजगुरव, मयूरेश कुलकर्णी, विनीत वर्तक, अ‍ॅड. रोहित राजगुरव व अ‍ॅड. राम शहाणे यांच्यासह सुमारे २५ महिलांनी आज आक्रमक भूमिका घेतली.उपअधीक्षक मुजावर यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात येऊन निवेदन स्वीकारले व याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून स्वत: पोलीस निरीक्षक पाटील यांनी तपास करण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)>तपासाची मागितली माहितीलोहट यांनी वैष्णवी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी २१ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी सातला तळेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासाचा पोलिसांनी खुलासा करण्याची मागणीही त्यांनी केली होती. शवविच्छेदन अहवालाचा तपशील, रेल्वे पोलिसांच्या अहवालाचा तपशील, वैष्णवीचे २०-२१ डिसेंबर या दोन दिवसातील फोनचे तपशील, तिच्या महाविद्यालयीन हजेरीचा तपशील या सर्वांचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.