शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

खुडूसच्या रिंगणात वैष्णव मेळा दंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 14:41 IST

सकाळच्या कोवळ्या उन्हात, ढगांच्या छायेखाली दिंड्या पताकामधून दोन अश्वांचा पाठशिवणीचा खेळ पाहुन चैतन्याने फुललेल्या वैष्णवांनी उडीया खेळ करून अवघ्या परिसरात डोळ्याचे पारणे फेडले़

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ११ -   सकाळच्या कोवळ्या उन्हात, ढगांच्या छायेखाली दिंड्या पताकामधून दोन अश्वांचा पाठशिवणीचा खेळ पाहुन चैतन्याने फुललेल्या वैष्णवांनी उडीया खेळ करून अवघ्या परिसरात डोळ्याचे पारणे फेडले़
अगदी सकाळचा चहा झाला की चहा रिंगणाला अशी परिस्थिती असलेल्या खुडूसच्या रिंगणात हरिपाठ उरकून ताजेतवाने झालेले वैष्णवजन एकत्र आले होते़. ८़.३० वाजता अश्व आले, ९ वाजता पालखी आली़ तोपर्यंत ज्योतीराम वाघ व जयवंत सीद या शेतक-यांच्या शेतात गावककºयांनी रिंगणाची स्वच्छता केली होती़ समर्थ रंगावलीच्या कलाकरांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या़ पालखीभोवती पताकाधारी नाचत होते़ तर टाळकरी पखवाज रिंगण करून खेळत होते़ चोपदार मंडवी व मालक रिंगणाची पाहणी करत होते़ सर्व औपचारिकता पूर्ण होताच धावण्याच्या इशारा होताच दोन्ही अश्वांनी चौखुर उघळण्यास सुरूवात केली़ पाहता पाहता अवघ्या सोहळ्यामध्ये रोमांच उभे राहिले़
याठिकाणी खेळण्यास जागा चांगली असल्याने रिंगणाच्या खेळानंतर उडीच्या खेळात वारकरी देहभान विसरले़ मनमुराद खेळानंतर दुपारच्या भोजनाला सोहळा निमगाव पारी येथे विसावला़
सोमवारी खुडूस येथे माऊलीच्या दर्शनासाठी माजीमंत्री राजेश टोपे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे,  आ़ प्रणिती शिंदे, माजी महापौर अलका राठोड, बाजार समितीच्या संचालिका इंदमुती अलगोंडा-पाटील आदी उपस्थित होते़ 
 
देहभान विसरून खेळला गेलेला खेळ प्रथमच पाहिला़ अनेक वृध्द महिला फुगडीचा खेळ खेळताना पाहुन बालपण आठवले आणि आम्हालाही यांच्यासोबत खेळावे वाटते़
- वर्षाराणी भोसले, तहसिलदार, माळशिरस़
 
रिंगण सोहळ्यातून एक वेगळी ऊर्जा मिळते़ रिंगणावेळी रोमांच उभे राहतात़ खेळाच्या हा प्रसंग निश्चितच आनंददायी वाटतो़ वेगवेगळे खेळ खेळताना स्वत:ला विसरून जातो़
- प्रतिभाताई पाचपुते़