शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

असहकार आंदोलनात अडली जनावरांची लस

By admin | Updated: July 1, 2014 00:49 IST

पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून राज्यस्तरीय ‘असहकार आंदोलन’ सुरू आहे. त्यामुळे पशुंसाठी असलेल्या विविध योजनांसह पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण रखडले आहे.

योजना प्रभावित : साडेचार हजार कर्मचारी मागण्यांवर ठाम सुहास सुपासे - यवतमाळपशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून राज्यस्तरीय ‘असहकार आंदोलन’ सुरू आहे. त्यामुळे पशुंसाठी असलेल्या विविध योजनांसह पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण रखडले आहे. आंदोलक मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. १० जूनपासून पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक आणि पशुधन विकास अधिकाऱ्यांनी ‘असहकार आंदोलन’ सुरू केले आहे. या दरम्यान कर्तव्यावर हजर राहायचे, पशुंवर प्राथमिक उपचार करायचे परंतु कामाचा अहवाल वरिष्ठांना पाठवायचा नाही. लसीकरण करायचे नाही तसेच विभागाच्या कोणत्याही योजना राबवायच्या नाहीत असे या आंदोलनाचे स्वरुप आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पशुंना घटसर्प व एकटांग्या या घातक आजारांसाठी करावे लागणारे लसीकरण रखडले आहे. राज्यातील साडेचार हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पशुधन विकास अधिकारी गट ब चे स्थान निश्चित करण्यात यावे आणि गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला फिक्स पे चा मुद्दा निकाली काढावा यासह इतरही मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत. याबाबत यापूर्वीसुद्धा मंत्री, प्रधान सचिव व आयुक्तांसोबत चर्चा झाली आणि त्यानंतर मिळालेल्या आश्वासनाच्या आधारे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु यावेळी आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असल्याचे संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष दिलीप चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या संदर्भात पशुसंवर्धन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी पुणे येथे बैठक पार पडली. या बैठकीत मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचे ठरले. या बैठकीला राज्यभरातील ३२ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनामुळे महत्त्वपूर्ण अशा कामधेनू व अन्य नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणीसुद्धा योग्यरित्या होत नसल्याचे दिलीप चौधरी म्हणाले.