शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात खोळंबली भातलावणीची कामे

By admin | Updated: July 12, 2017 04:28 IST

सलामीलाच जोरदार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील भातशेतीही लावणीच्या प्रतीक्षेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : सलामीलाच जोरदार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील भातशेतीही लावणीच्या प्रतीक्षेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५५ टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ टक्के इतक्याच लावण्या पूर्ण झाल्या आहेत. रविवारपासून पावसाने पुनरागमन केल्यामुळे येत्या काही दिवसांत या कामाला अधिक गती येईल, अशी अपेक्षा आहे.जूनमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. त्या काळात नांगरणी आणि पेरणीची कामे पारंपरिक वेळापत्रकानुसार झाली. मात्र जुलैमध्ये पावसाने दडी मारल्याने लावणीच्या कामाला चांगलीच खीळ बसली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तीन प्रकारची शेती आहे. डोंगर उतारावरची शेती, पायथ्याची शेती आणि सखल भागातील शेती. सद्य:स्थितीत सखल भागातील शेतीला पाण्याची कमतरता नाही. झालेल्या पावसाच्या आधारावर सखल भागातील लावण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, डोंगर उतारावरच्या आणि पायथ्याच्या शेतीला मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ७१ हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भातशेती केली जाते. आजच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यात ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ हजार हेक्टर क्षेत्रात लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. नागली, वरी आणि भाजीपाल्याची लागवड तुलनेने खूपच कमी आहे. मात्र, त्यालाही पावसाची प्रतीक्षा आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने नांगरणी आणि पेरणीची कामे वेळेत झाली. त्यामुळे रोपे चांगली तयार झाली आहेत. मात्र, चिखलणीसाठी पाऊसच नसल्याने तयार झालेली रोपे सुकून जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. >पंप लावून लावण्याज्या भागात शेताच्या जवळपास नदी किंवा मोठे ओढे आहेत, अशा भागात पंपाने पाणी खेचून शेती केली जात आहे. मात्र, त्यासाठी पंप भाड्याने आणावे लागत असल्याने ते खर्चिक होत आहे. त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहात आहेत.जिल्हाएकूण क्षेत्रलावणी झालेलेटक्केहेक्टरमध्येक्षेत्र (हे.)रत्नागिरी७१,०००३९,०५०५५सिंधुदुर्ग५०,२३०२०,७२७४१