शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

महिला व बालविकास विभागातील पदे रिक्त

By admin | Updated: April 4, 2017 03:18 IST

महिला व बालकांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या विभागात अधिकारी वर्गाच्या मंजूर असलेल्या पदापैकी तब्बल ६७ टक्के पदे रिक्त आहेत.

मुंबई : राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या विभागात अधिकारी वर्गाच्या मंजूर असलेल्या पदापैकी तब्बल ६७ टक्के पदे रिक्त आहेत. वर्ग एक व वर्ग दोन या पदासाठी ६९२ पैकी केवळ २२८ अधिकारी कार्यरत असल्याची धक्कादायक कबुली दस्तुरखुद्द या विभागाने माहिती अधिकारात दिली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती विचारली होती. त्यामध्ये त्यांना कळविण्यात आले की, ३४ जिल्हा परिषदांपैकी ३२ ठिकाणी वर्ग १ अंतर्गत महिला व बालविकास अधिकारी कार्यरत आहेत. तर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याची १०४ पदे मंजूर असून त्यापैकी ७१ पदे भरण्यात आलेली आहेत. ३३ जागा रिक्त आहेत. तर वर्ग-२ अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, (ग्रामीण प्रकल्प) यासाठी ५५४ पदे मंजूर असून त्यापैकी केवळ १२५ पदे कार्यरत आहेत. ४२९ जागा रिक्त असून ही पदे भरण्याची जबाबदारी आयुक्त विनिता वेद सिंघल यांच्यावर आहे. त्यांच्याकडे एकात्मिक बालविकास योजनेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.सरकारने १९९३ पासून महिला व बालविकास विभाग स्वतंत्रपणे कार्यान्वित केला आहे. मात्र सध्या ६७ टक्के पदे रिक्त असल्याने विभागाचा कारभार संथगतीने चालू आहे. गेल्या दोन वर्षांच्या कारभाराची लोकायुक्तांकडून चौकशी करावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे. (प्रतिनिधी)