शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वि. भा. देशपांडे यांचे निधन

By admin | Updated: March 10, 2017 00:51 IST

मराठी रंगभूमीचा चालता बोलता कोश असलेले ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. विश्वनाथ भालचंद्र देशपांडे तथा वि.भा. देशपांडे (वय ७८) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

पुणे : मराठी रंगभूमीचा चालता बोलता कोश असलेले ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. विश्वनाथ भालचंद्र देशपांडे तथा वि.भा. देशपांडे (वय ७८) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात कन्या विशाखा, जावई व नातू असा परिवार आहे.वि.भा.देशपांडे यांचे पार्थिव दर्शनासाठी आधी एरंडवणा परिसरातील राहत्या घरी, त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेत ठेवण्यात आले होते. तेथे मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. कोणतेही धार्मिक विधी न करता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, गायक रघुनंदन पणशीकर, आदी उपस्थित होते. डॉ. देशपांडे पाच दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक, विशेषत: नाट्यक्षेत्रात कार्यरत होते.मराठी नाट्यकोश या सुमारे १२०० पानी ग्रंथांचे लिखाण व संपादन करुन मराठी वाड.मयात त्यांनी मोलाची भर टाकली. वि.भा. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष होते. २००६ मध्ये निवडून आलेल्या परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये ते प्रमुख कार्यवाह होते. कार्याध्यक्ष गं. ना. जोगळेकर यांच्या निधनानंतर कार्याध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली. पुण्यात २०१० मध्ये झालेल्या ८३व्या साहित्य संमेलनातून शिल्लक राहिलेला ८२ लाख रुपयांचा निधी साहित्य परिषदेला मिळवून देण्यात त्यांचा प्रमुख हातभार होता. (प्रतिनिधी)‘लोकमत’मध्येही नियमीत लिखाणवि. भा. देशपांडे यांचा जन्म ३१ मे १९३८ रोजी पुण्यामध्ये झाला. नूतन मराठी विद्यालय व स. प. महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. ते मराठी आणि नाट्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. मॉडर्न महाविद्यालयात त्यांनी ३५ वर्षे अध्यापनाचे काम केले. ‘मराठी ऐतिहासिक नाटक’ या विषयावर त्यांनी पी.एचडी केली. त्यांचे स्वतंत्र व संपादित असे सुमारे ५० ग्रंथ प्रसिद्ध असून विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. ‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’, ‘निळू फुले’, ‘नाट्यभ्रमणगाथा’, ‘निवडक नाट्यप्रवेश : पौराणिक’, ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, भीमसेन जोशी, कमलाकर सारंग अशा अनेक मंडळींशी त्यांचे मैत्र जुळले होते. ‘लोकमत’मध्येही ते नियमीत लिखाण करीत होते.