शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नाविन्यपूर्ण शैक्षणिक बँकेचा प्रयोग यवतमाळात

By admin | Updated: September 19, 2014 00:50 IST

शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शिक्षकांचा चांगला उपक्रम इतर शाळांमध्ये राबविता यावा, त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी एज्युकेशनल इनोव्हेशनल बँक (नाविन्यपूर्ण

दर्जेदार शिक्षणाचे मॉडेल : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत स्वतंत्र विभागरूपेश उत्तरवार -यवतमाळ शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शिक्षकांचा चांगला उपक्रम इतर शाळांमध्ये राबविता यावा, त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी एज्युकेशनल इनोव्हेशनल बँक (नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम) तयार करण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाशी करार करण्यात आला. या उपक्रमाचा प्रारंभ यवतमाळातून होत असून त्यासाठी येथील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत (डायट) स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. रविजे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, आयआयएम अहमदाबाद आणि स्टेट इनोव्हेशनल अ‍ॅण्ड रिसर्च फाउंडेशन सोलापूर यांचा शालेय शिक्षण विभागाशी १६ आॅगस्टला तीन वर्षासाठी करार झाला. याला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे सहकार्य करणार आहे. तीन वर्ष हा उपक्रम राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये राबविला जाणार आहे. शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी हा उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतेला आहे. करारा नंतर पहिली कार्यशाळा यवतमाळात नुकतीच पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील २०० शाळांतील शिक्षकांनी भाग घेतला. प्रयोगाच्या माध्यमातून शिक्षणात बदल झाले असे प्रयोग या ठिकाणी सादर करण्यात आले. यातील उत्कृष्ट उपक्रमांची दखल घेण्यात आली. हे प्रयोग राज्यातील शाळांसाठी खुले केले जाणार आहेत. स्वतंत्र संकेतस्थळावर त्याची नोंद होणार आहे. यावर संपूर्ण उपक्रमाची माहिती, शिक्षकाचा फोटो आणि त्याचा मोबाईल नंबर असणार आहे. संकेतस्थळाचा वापर करून गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळेला उपक्रम राबविता येणार आहे. इतकेच नव्हे तर मोबाईलच्या मदतीने शिक्षकांना त्यातील अडचणी विचारता येणार आहेत. यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत इनोव्हेशनल सेल स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र संकेतस्थळ राहणार आहे. यामध्ये या संपूर्ण उपक्रमांची नोंद राहणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची नोंद या उपक्रमात करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे राज्य समन्वयक सिध्दराम माशाळे, बाळासाहेब वाघ यांनी जिल्ह्यातील शिक्षकांकडून उपक्रमांची माहिती घेतली. ही माहिती इनोव्हेशनल बँक उपक्रमात समाविष्ट केली जाणार आहे.