शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक शेतीसाठी गणिताचा वापर अनिवार्य!

By admin | Updated: March 18, 2015 23:19 IST

लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू एस.बी. निमसे यांची ‘लोकमत’शी बातचीत.

राजरत्न सिरसाट/अकोला: काही शाखापुरतं र्मयादित गणिताचं स्वरू प आता बदललं असून, सामाजिक, शेती शास्त्रात गणिताचा वापर वाढला आहे. संशोधन आणि संख्यात्मक माहिती जाणून घेण्यासाठी संगणकीय आज्ञाप्रणालीचा वापर करू न योग्य निष्कर्ष काढता येत असल्याने कृषी क्षेत्रात या प्रणालीचा वापर अनिवार्य असल्याची माहिती लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस.बी. निमसे यांनी दिली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गणितीय आकडेमोड सॉफ्टवेअरचा कृषी क्षेत्रात वापर या विषयावर आयोजित पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी १७ मार्च रोजी डॉ. निमसे येथे आले असताना त्यांनी खास लोकमतशी बातचीत केली.प्रश्न- गणितीय पद्धतीचा वापर संशोधनाला कसा पुरक ठरतो?उत्तर- गणितीय आकडेमोड पद्धतीमुळे संशोधनाला पुरक संख्यात्मक आकडेवारी, ग्राफ्स, आकृती काढणे, संशोधनाचं पृथ्थकरण, विश्लेषण करणे सोपे झाले आहे.प्रश्न- कधीपासून या पद्धतीचा वापर होतोय?उत्तर- संशोधन, अभियांत्रिकीसाठी गणितीय पद्धत अनिवार्यच आहे; परंतु हे काम पारंपरिक पद्धतीने होत असल्याने या कामाला, संशोधनाला बराच काळ लागत होता. गाणित या विषयासाठी आता खास सॉफ्टवेअर विकसित झाले आहे. कंपनी आणि इतर अभियांत्रिकी क्षेत्रात या सॉफ्टवेअरचा वापर करू न माहितीचे संग्रहण आदी कामासाठी केला जात आहे. पण, कृषी क्षेत्रात अलीकडेच या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत असल्याने कृषी शाखेचे विद्यार्थी, शास्त्रज्ञांना या सॉफ्टवेअरची इंत्थभूत माहिती देऊन प्रशिक्षित करणे आवश्यक झाले आहे.प्रश्न-कृषी क्षेत्रात या पद्धतीचा नेमका उपयोग काय?उत्तर -कृषी क्षेत्रात या आधुनिक गणितीय पद्धतीमुळे क्रांती होणार आहे. नवीन शोध, बियाणे संशोधन निर्माण करण्यासाठी तुलनात्मक व अचूक निष्कर्ष काढणे आणि तेही कमी वेळात या नवीन संगणकीय आज्ञाप्रणालीमुळे सोपे झाले आहे. या गणितीय सॉफ्टवेअरचा वापर करू न या राज्यातील कांदा उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भविष्यातील बाजारभाव काय असतील, हे जाणून घेण्यासाठी केला आहे. त्यामुळे बाजारभाव आदीसाठी शेतकर्‍यांना व्यापार्‍यांचा सल्ला घेण्याची गरज उरली नाही, हे विशेष.प्रश्न- आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आणि आता लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आहात, आपल्याला सध्याच्या शैक्षणिक पद्धतीबाबत काय वाटते?उत्तर- सध्याच्या शिक्षण पद्धतीत क्रांतिकारी बदलाची गरज आहे, अन्यथा येणार्‍या पिढय़ा या केवळ संगणकावरील मजकूर कट- पेस्ट करणार्‍या निर्माण होतील. संगणक अनिवार्य असले तरी त्याचा वापर अर्मयाद वाढला आहे. सध्या या माध्यमातून माहिती वजा शिक्षण दिलं जात आहे. जे घरी करता येतयं त्यावरच सध्या खर्च सुरू आहे.प्रश्न- काय बदल असावे, असे तुम्हाला वाटतयं? उत्तर- समूह चर्चा, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी चर्चा, विद्यार्थ्यांना प्रकल्पाद्वारे शिक्षण देणे गरजेचे आहे. संगणक काळात मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच चौथ्या वर्गापासून पुढे परीक्षा पद्धती अनिवार्य करणे गरजेचे आहे. अभ्यासक्रम विद्यार्थ्यांवर दडपण आणणारा नसावा, शिक्षणाची भीती वाटू नये असे ते असावे, अर्थात शिक्षण हे मनोरंजन, खेळासारखे सहज वाटले पाहिजे.प्रश्न- कृषी अभ्यासक्रमात कोणते बदल हवेत?उत्तर- खरे तर देशातील अडीच कोटी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या एक टक्कय़ापेक्षा कमी आहे. याकरिता शाळापासून ते कृषी महाविद्यालयाव्यतिरिक्त कला, वाणिज्य शाखेतील महाविद्यालयात कृषी या विषयाची किमान ओळख असावी, यासाठीचे शिक्षण देणे काळाची गरज आहे. कला, वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर नोकरी न मिळाल्यास त्या विद्यार्थ्यांला किमान शेतीमध्ये करिअर करता आले पाहिजे.*मराठी माणूस लखनौ विद्यापीठाचा कुलगुरू लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.एस. निमसे हे अहमदनगर जिल्हय़ातील माडवे या गावचे असून, प्राथमिक शिक्षण त्यांनी याच गावात तर माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथील हायस्कूलमध्ये घेतले आहे. एमएससी पुणे विद्यापीठातून तर एमफील, पीएचडी मेरठ विद्यापीठातून पूर्ण केली आहे. ते नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे २0१२ पर्यंत कुलगुरू होते. २0१२ पासून ते लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. ते प्रसिद्ध गणिततज्ज्ञ असून, शैक्षणिक अभ्यासासाठी त्यांनी १५ देशांना भेटी दिल्या आहेत. सध्या ते कुलगुरू सह इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.