शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

चंद्रपूर केंद्रावर १३ नाट्यप्रयोग

By admin | Updated: November 13, 2015 00:30 IST

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यंदा चंद्रपुरातील केंद्रावर १३ नाट्यप्रयोग होणार आहे

चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यंदा चंद्रपुरातील केंद्रावर १३ नाट्यप्रयोग होणार आहे. १८ नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून ३० नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत.स्थानिक प्रिदयर्शिनी इंदिरा गांधी नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळात हे प्रयोग होणार आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून चंद्रपूरसह यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, वणी, येथील नाट्यसंस्था यात सहभागी होत आहेत.स्पर्धेच्या वेळापत्रकाप्रमाणे १८ नोव्हेंबर सिद्धीविनायक प्रतिष्ठान, यवतमाळ या संस्थेचे नाटक ‘अभिनेत्री’ (लेखक गिरीश जोगी, दिग्दर्शक कल्पना जोशी), १९ नोव्हेंबर समुत्कर्ष बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली या संस्थेचे ‘परिवर्तन’ (लेखक, दिग्दर्शक राजरतन देविदास पेटकर), २० नोव्हेंबर समुत्कर्ष बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ ‘तप्त दाही दिशा’ (लेखक डॉ. राजेंद्र धामणे, दिग्दर्शक राजाभाऊ भगत), २१ नोव्हेंबर डॉ. श्यामाप्रसाद सार्वजनिक वाचनालय चंद्रपूरचे ‘हणम्याची मरीमाय’ (लेखक विजय खानविलकर, दिग्दर्शक श्रीनिवास मुळावार), २२ नोव्हेंबर कामगार मनोरंजन केंद्र चंद्रपूर या संस्थेचे नाटक ‘देवाशपथ खोट सांगेन’ (लेखक डॉ. मोहन पानसे, दिग्दर्शक मोहन जोशी), २३ नोव्हेंबर कलावैभव नाट्य व सांस्कृतिक संस्था यवतमाळकडून ‘खेळ’ (लेखक अनिल दांडेकर, दिग्दर्शक अविश वत्सल), २४ नोव्हेंबर कलाश्रय ज्ञान व कला संवर्धन मंडळ, यवतमाळकडून ‘आसरुबा’ (लेखक सुनील देशपांडे, दिग्दर्शक प्रशांत गोडे), २५ नोव्हेंबर अस्मिता रंगायतन यवतमाळचे ‘माझा खेळ मांडू दे’ (लेखक सई परांजपे, दिग्दर्शक अशोक आष्टीकर), २६ नोव्हेंबर फुलोरा सामाजिक विकास संस्था, वर्धा या संस्थेचे ‘घर तिघाचं हवं’ (लेखक रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक विकास फटिंगे), २७ नोव्हेंबर नवोदिया चंद्रपूर या संस्थेचे ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ (लेखक अभिराम भडकमकर, दिग्दर्शक डॉ. जयश्री कापसे- गावंडे), २८ नोव्हेंबर कल्पतरु बहुउद्देशीय संस्था, यवतमाळचे ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ (लेखक- अशोक पाटोळे, दिग्दर्शक विलास राखे), २९ नोव्हेंंबर अध्ययन भारती वर्धाकडून ‘श्रीकांत प्रभुणेची प्रेमकथा’(लेखक- श्याम पेटकर, दिग्दर्शक चैतन्य आठले), ३० नोव्हेंबर आदिवासी लोकरंग कलामंच बहुउद्देशीय संस्था, वणी जिल्हा यवतमाळकडून ‘कातरवेळ’ (लेखक डॉ.माणिक वड्याळकर, दिग्दर्शक आनंद गेडाम) असे नाट्यप्रयोग होणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)