शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

उरी येथील हल्ल्याचा निषेध

By admin | Updated: September 24, 2016 01:33 IST

हल्ल्याच्या निषेधार्थ कामशेत शहर शिवसेना व मुस्लिम समाजाच्या वतीने येथे मोर्चा काढून निषेध करण्यात आला.

कामशेत : उरी येथे भारतीय जवानांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कामशेत शहर शिवसेना व मुस्लिम समाजाच्या वतीने येथे मोर्चा काढून निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजीमहाराज या प्रमुख चौकातून मोर्चा काढून पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा परत चौकात आल्यानंतर सभा घेण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी भाषण करून निषेध व्यक्त केला. मुस्लिमबांधवांनी उत्स्फूर्तपणे भाषण करून जोरदार घोषणाबाजी केली. सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत झाले. पाकिस्तानी दहशतवाद्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देऊन निषेध करण्यात आला. उरी येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जातीपातीचे राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन उरी येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करायला हवा. या हल्ल्याबाबत जनसामान्यांत संतापाची भावना आहे, असे तालुकाप्रमुख खांडभोर म्हणाले. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, उपविभाग प्रमुख डॉ. विकेश मुथा, शहरप्रमुख गणेश भोकरे, दत्ता दौंडे व मुस्लिम समाजबांधव यांनी केले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भारत ठाकुर, भूषण जगताप, सुरेश गायकवाड, संतोष बोंबले, अंकुश सातकर, सागर मोरे, दत्ता वावरे, सब्बीर शेख, मुबारक खान, बाबुलाल पठाण, गणी शेख, रमजान पठाण, तौफिक शेख, साजिक तांबोळी, उमर शेख, मिस्टर खान, कारी हुसेमा खान, जुनेद शेख, अमिन शेख, अल्लादीन खान, इब्राहिम शेख व इतर उपस्थितहोते. (वार्ताहर)>लोणावळ्यात शहीद जवानांना श्रद्धांजलीलोणावळा : उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना येथे सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. याकरिता भांगरवाडीतील लोहगड दर्शन ते शिवाजी पुतळा चौक अशी निषेध रॅली काढत हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला.मावळ वार्ता फाउंडेशन, लायन्स क्लब-लोणावळा व खंडाळा, लायन्स सुप्रीमोज् व लोणावळेकर यांनी आयोजन केले होते. रॅलीत उमा मेहता, राजेश आगरवाल, श्रीधर पुजारी, विनय विद्वांस, किरण गायकवाड, संजय गायकवाड, राजेंद्र चौहान, आमिन वाडीवाल, बाळासाहेब फाटक, जितेंद्र टेलर, मारुती तिकोणे, बापुलाल तारे, सचिन तळेकर, संदीप वर्तक, प्रगती साळवेकर, मनीषा बंबोरी आदी उपस्थित होते.