शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

युरिया धोरण बदलणार

By admin | Updated: July 11, 2014 02:32 IST

युरिया खतासाठी नवे धोरण बदलण्याची घोषणा आज, गुरुवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात केली.

शे ती उत्पादन, सिंचन योजना, नवीन कृषी विद्यापीठ, महामंडळे वाढविण्यासाठी तसेच युरिया खतासाठी नवे धोरण बदलण्याची घोषणा आज, गुरुवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात केली. युरियावर शासन आणि शेतक:यांकडून 8,5क्क् कोटी रुपये विनाकारण खर्च होत आहेत, असे लक्षात आले आहे. याचा भरुदड अन्नधान्य खरेदी करणारा आणि कर भरणा:यांना सोसावा लागतो. यासाठी खताचे नवे धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे जेटली यांनी सांगितले. 
यंदा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. परिणामी शेतीतील उत्पन्न कमी  येणार आहे; त्यांच्यासाठीही शासन योग्य निर्णय घेणार आहे असे सांगून जेटली म्हणाले, राज्य शासनाने देखील शेतमालाच्या बाजारपेठ विकासासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. शेतीच्या कृषी तंत्रज्ञानाच्या पायाभूत सविधांसाठीही 1क्क् कोटींची तरतूद केली आहे. 
शेतक:यांना आधुनिक शेतीची माहिती तसेच शासनाची माहिती मिळावी यासाठी ‘किसान टी.व्ही.’ ही वाहिनी सुरू करण्यात येणार असून, यामध्ये कृषी तंत्रज्ञान, जल संवर्धन, जैविक शेतीची माहिती मिळणार आहे. 
किसान विकास पत्र ही शेतक:यांसाठी योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शेतकरी इतर बँकांमध्ये आर्थिक गुंतवणूक करतात. मात्र शेतकरी किसान विकास पत्रत गुतवणूक करतील, यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. पीक घेताना कोणते हवामान कसे असावे, याच्या माहितीसाठी ही योजना प्रस्तावित आहे. ही योजना 2क्14-2क्15 या आर्थिक वर्षातही सुरू राहणार आहे. 
देशातील पाच लाख भूमिहीन शेतक:यांना नाबार्डकडून अर्थसहाय करण्यात येणार आहे. भूमिहीनांना कर्जासाठी अधिक व्याज द्यावे लागते. माती परीक्षणाच्या फिरत्या प्रयोगशाळाही देशभरात उभारण्यात येणार आहेत. यसाठी 56 कोटींची तरतूद केली आहे. ग्रामीण आणि विभागीय बँकांना पुनर्वित्तपुरवठा करण्यासाठी दीर्घ मुदतीच्या ग्रामीण पतनिधीची तरतूद केली आहे. उत्पादन संघटना विकास निधीसाठी येत्या दोन वर्षात 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक शेतक:याला भूमी आरोग्य कार्ड देण्यासाठी 100 कोटींची तरतूद केली आहे.
 
‘राष्ट्रीय पेयजल’ला  36क्क् कोटी रुपये
राष्ट्रीय पेयजल योजनेकरिता 3,6क्क् कोटींची तरतूद करण्यात आली असून, रसायने, कीटकनाशके यामुळे दूषित होणारे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात 
येतील.
 
नदीजोडचा नव्याने अभ्यास
यूपीए सरकारने शीतपेटीत 
टाकलेला नदीजोड प्रकल्प योजना पुन्हा हाती घेण्याचा इरादा जाहीर करतानाच या योजनेचा र्सवकष अभ्यास करून प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याकरिता 1क्क् कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
 
जलसिंचनासाठी ‘निरांचल’
देशातील अधिकाधिक कृषिक्षेत्र जलसिंचनाखाली आणण्याकरिता ‘निरांचल’ या नव्या कार्यक्रमाची घोषणा करतानाच यासाठी चालू अर्थिक वर्षाकरिता 2क्,142 कोटींची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा जेटली यांनी केली.
 
घाट सुशोभीकरण
याशिवाय केदारनाथ, हरिद्वार, कानपूर, वाराणसी, अलाहाबाद, पटना आणि दिल्ली येथील नदीघाटांच्या सुशोभीकरणासाठी 1क्क् कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 
 
गंगा नदीवर जलमार्ग प्रकल्प
गंगा नदीवर ‘जलमार्ग विकास प्रकल्प’ सुरू करण्यात येणार असून, पुढील सहा वर्षामध्ये 4,2क्क् कोटी रुपये खर्च  करण्याचा प्रस्ताव आहे. यातून अलाहाबादपासून हल्दियार्पयतचा 1,62क् किलोमीटर लांबीच्या जलमार्गावर जहाज वाहतूक सुरू करण्याचा संकल्प अर्थसंकल्पात आहे.