शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘यूपीआय अ‍ॅप’द्वारे सव्वा कोटीचा गंडा

By admin | Updated: April 14, 2017 02:38 IST

‘यूपीआय’ (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) अ‍ॅपचा गैरवापर करून बॅँक आॅफ महाराष्ट्रच्या नवी पेठ शाखेतील सहा ग्राहकांना ४९ लाख रुपयांचा आॅनलाइन गंडा घालणाऱ्या जितेंद्र

जळगाव : ‘यूपीआय’ (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) अ‍ॅपचा गैरवापर करून बॅँक आॅफ महाराष्ट्रच्या नवी पेठ शाखेतील सहा ग्राहकांना ४९ लाख रुपयांचा आॅनलाइन गंडा घालणाऱ्या जितेंद्र मारुती रंधे (रा. चिखली, जि. बुलढाणा) याचे अन्यही कारमाने आता उघडकीस येत आहेत. जळगाव जिल्ह्यात विविध प्रकरणांत त्याने १ कोटी २८ लाख रुपये लुबाडल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच राज्यभरात त्याने नऊ ठिकाणी असे गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.यूपीआय अ‍ॅपचा वापर करून जितेंद्र मारुती रंधे, अता मोहम्मद खान, राजेंद्र भानुदास बारडे, विजय वसंतराव मुडकुले, गोपाळ गोविंदराव वानखेडे, सुनील केशवराव पंडागळे व राजेश जनार्दन बुडूखले यांच्या वेगवेगळ्या बॅँक खात्यांत ४८ लाख ९४ लाख ५८२ रुपये परस्पर वर्ग करण्यात आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बॅँकेच्या मुख्य व्यवस्थापिका छाया गिरीश भगुरकर (रा. मोहाडी रोड, जळगाव) यांनी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून १३ जणांविरुद्ध फसवणूक व आयटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.जितेंद्र रंधेविरुद्ध पुणे शहरात एकच संयुक्त गुन्हा दाखल झाला आहे. तो १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहे. आमच्या तपासात ९ ठिकाणी त्याने असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.- सुनील पवार, पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम, पुणे