शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व द्रुतगती मार्गावरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 02:10 IST

‘पंतनगर जंक्शन’ येथील सुमारे २ एकर जागेवरील नर्सरी, वाहनतळ, खडी-रेतीवाले ही अनधिकृत बांधकामे पालिकेने जमीनदोस्त केली

मुंबई : अंधेरी-घाटकोपर व पूर्व द्रुतगती महामार्गाच्या नाक्यावरील ‘पंतनगर जंक्शन’ येथील सुमारे २ एकर जागेवरील नर्सरी, वाहनतळ, खडी-रेतीवाले ही अनधिकृत बांधकामे पालिकेने जमीनदोस्त केली; तसेच भूमाफिया मोहम्मद कल्लू शाह याच्याविरुद्ध एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन एकरच्या भूखंडावर महापालिकेची वेगवेगळी आरक्षणे असून, त्यामध्ये रस्ता, अग्निशमन दल, महापालिका रुग्णालय, महापालिका दवाखाना व हरित पट्टा या आरक्षणांचा समावेश आहे. गेल्या ८-१० वर्षांपासून या भूमाफियाने या जागेवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभारली होती. तसेच नर्सरी, खडी-रेतीवाले, वाहनतळ अशा निरनिराळ्या व्यावसायिकांच्या वापराकरिता ही जागा त्याने भाड्याने दिली होती. भूमाफियाने ३० ते ४० खोटी प्रकरणे न्यायालयात दाखल करून महापालिकेची तसेच न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम केले होते. या भूमाफियाविरुद्ध अनेक वर्षांपासून तक्रारी दाखल होत्या, तसेच तो अवैध व्यवसायांस प्रोत्साहन देत असल्याने, नागरिकांचाही त्याच्यावर रोष होता, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.दरम्यान, ही कारवाई करण्यासाठी ६ जेसीबी, २ पोकलेन, खासगी व महापालिकेचे १५ डम्पर, ५० पोलीस, २० पोलीस अधिकारी व महापालिकेचे १०० कर्मचारी यांची मदत घेण्यात आली. मोकळा करण्यात आलेला व विविध आरक्षणे असलेला २ एकरचा भूखंड महापालिकेने ताब्यात घेतला असून, त्यास कुंपणही घातले आहे. तसेच लगतची ‘बेस्ट’ची जमीन ‘बेस्ट’कडे सुपुर्द करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)