शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर नाईकविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

By admin | Updated: April 14, 2017 02:28 IST

वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झकीर नाईक याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याचा आदेश येथील विशेष न्यायालयाने गुरुवारी दिला.

मुंबई : वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झकीर नाईक याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याचा आदेश येथील विशेष न्यायालयाने गुरुवारी दिला.‘मनी लॉन्ड्रिंग’च्या एका प्रकरणात नाईक जबाब नोंदविण्यासाठी तीनदा समन्स काढूनही हजर न झाल्याने अजामीनपात्र वॉरंटसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अर्ज केला होता. ‘अनिवासी भारतीय’ असलेल्या नाईकचे वास्तव्य सध्या आखाती देशांत असल्याचा कयास आहे. आता या वॉरंटआधारे त्याच्या प्रत्यार्पणासाठी किंवा इंटरपोलच्या माध्यमातून त्याच्याविरुद्ध ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करण्यास बळकटी मिळेल.राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बेकायदा कारवाई ा्रतिबंधक कायद्यान्वये नोंदविलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने नाईक व इतरांविरुद्ध ‘मनी लॉड्रिंग’ची फिर्याद नोंदविली आहे. आरोपींनी गुन्ह्यातून मिळविलेला पैसा काळ््याचा पांढरा केला, असा आरोप असून ईडीला त्या अनुषंगाने जाबजबाब घ्यायचे आहेत.५१ वर्षांचा नाईक ‘इस्लामी रिसर्च फाऊंडेशन’ आणि ‘पीस टीव्ही’ चालवितो. ‘पीस टीव्ही’वर त्याची इस्लामी धर्मशास्त्रावरील प्रवचने प्रसारित होतात. गेल्या वर्षी बांगलादेशात ढाकातील उपाहारगृहात स्फोट झाल्यानंतर अटक केलेल्यांपैकी काहींनी नाईक यांच्या प्रवचनांवरून स्फूर्ती घेतल्याची कबुली दिली. यानंतर त्यांच्याविरुद्ध समाजात वितुष्ट निर्माण करणे याखेरीज बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. याखेरीज केंद्र सरकारने स्वतंत्र कारवाई करून ‘इस्लामी रिसर्च फाऊंडेशन’वर बंदी घालून देणगी स्वीकारण्यास प्रतिबंध केला. (विशेष प्रतिनिधी)