शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे परीक्षा वेळापत्रक बिघडले

By admin | Updated: November 5, 2014 04:29 IST

मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस हॉलतिकिटाचा गोंधळ संपतो ना संपतो तोच मंगळवारी यामध्ये आणखी एका वादाची भर पडली आहे

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस हॉलतिकिटाचा गोंधळ संपतो ना संपतो तोच मंगळवारी यामध्ये आणखी एका वादाची भर पडली आहे. टीवायबीएसस्सीची १८ नोव्हेंबर रोजी होणारी पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरची परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळेत आल्याने विद्यापीठाचा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण आहे.विधानसभा निवडणुकांमुळे पुढे ढकललेल्या विद्यापीठाच्या आॅक्टोबर परीक्षा सध्या सुरू आहेत. टीवायबीएस्सीच्या पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरची परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होत आहेत. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५.३० या वेळात दोन्ही सेमिस्टरचे आॅरगॉनिक केमिस्ट्री आणि अपलाइड कंपोनंट हे पेपर आहेत. एकाच दिवशी पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरची परीक्षा घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. सहाव्या सेमिस्टरची परीक्षा देणारे विद्यार्थी त्याच दिवशी आणि वेळेत सेमिस्टर पाचच्या एटीकेटीचा पेपर देणार आहेत. त्यामुळे कोणत्या परीक्षेला उपस्थित राहावे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यापीठाच्या हॉल तिकिटाचा गोंधळ व वेळापत्रकातील चुकांमुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे विद्यापीठाने वारंवार होणाऱ्या गोंधळास जबाबदार असणाऱ्या एमकेसीएल या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केली आहे. (प्रतिनिधी)