शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘एरोमॉडेलिंग’च्या जादुगाराची अनोखी झेप

By admin | Updated: August 12, 2014 01:13 IST

काही लोक इतिहास घडताना पाहतात, परंतु मोजक्या लोकांना इतिहास घडविण्यात जास्त रस असतो. शिक्षण, अभ्यास अन् पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव कधी कधी जास्त महत्त्वाचा ठरतो.

अनुभवाला जिद्दीची जोड : राजेश जोशी यांना मानद ‘पीएचडी’ योगेश पांडे - नागपूरकाही लोक इतिहास घडताना पाहतात, परंतु मोजक्या लोकांना इतिहास घडविण्यात जास्त रस असतो. शिक्षण, अभ्यास अन् पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव कधी कधी जास्त महत्त्वाचा ठरतो. अन् अनुभवाला जर जिद्द आणि कष्टांची जोड मिळाली तर क्या कहने! उपराजधानीत ‘एरोमॉडेलिंग’चे ‘कल्चर’ रुजविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या राजेश जोशी यांनी ही बाब प्रत्यक्षात आणून दाखविली आहे. गेल्या अडीच दशकांपासून जळी, काष्ठी अन् पाषाणी केवळ ‘एरोमॉडेलिंग’च्या विमानांचाच ध्यास घेतलेल्या जोशी यांना ‘आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’ने मानद ‘पीएचडी’ प्रदान केली आहे. या विषयावरील ही पहिलीच ‘पीएचडी’ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे जोशी यांनी या विषयात कुठलेही शास्त्रोक्त शिक्षण घेतले नसले तरी, यावरील त्यांची पकड भल्याभल्यांना अचंबित करणारी आहे.राजेश जोशी यांनी ‘एनसीसी’च्या माध्यमातून ‘एरोमॉडेलिंग’चे धडे घेतले. या विषयातील कुठलेही शास्त्रोक्त पुस्तकी शिक्षण घेतले नसतानादेखील त्यांनी निरनिराळे प्रयोग करून विविध धाटणीची आणि डिझाईनची विमाने बनविली. इतकेच नव्हे तर निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी २६ हून अधिक पदकेदेखील मिळविली आहेत. चांगली सरकारी नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी ‘एरोमॉडेलिंग’वरील आपले प्रेम कधी कमी होऊ दिले नाही. निरनिराळी पुस्तके व प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी स्वत:च बारीक तांत्रिक बाबीदेखील जाणून घेतल्या. ‘एरोमॉडेलिंग’चे आधुनिक तंत्र आत्मसात करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांअगोदर २१ फुटांचे ‘एरोमॉडेलिंग’चे विमान तयार केल्याबद्दल ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्डस्’मध्ये त्यांचे नाव नोंदविण्यात आले होते. आता ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी त्यांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.उपराजधानीचे नाव उंचावलेउपराजधानीला मध्य भारताचे शैक्षणिक ‘हब’ मानण्यात येते. विशेषत: येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये असून निरनिराळे अभ्यासक्रम येथे चालतात. परंतु ‘एरोमॉडेलिंग’बद्दल नागपुरात फारशी जागरूकता दिसून येत नव्हती. परंतु गेल्या ३२ वर्षांपासून ‘एरोमॉडेलिंग’च्या क्षेत्रात असणाऱ्या राजेश जोशी यांच्या प्रयत्नांमुळे नागपुरातील विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल रस निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांनी प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांनी ‘आयआयटी’सारख्या नामवंत संस्थांमधील स्पर्धांत पहिला क्रमांक पटकावून उपराजधानीचे नाव उंचावले आहे.