शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

युनिकोडमधील मराठी प्रमाणित होईल - तावडे

By admin | Updated: February 28, 2016 01:20 IST

मराठीची ओळख असणारी ‘युनिकोड’ भाषा जागतिक पातळीवर नेण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे. ‘युनिकोड कन्सेर्शियम’ या आंतरराष्ट्रीय मानक संस्थेचे सदस्यत्व

मुंबई : मराठीची ओळख असणारी ‘युनिकोड’ भाषा जागतिक पातळीवर नेण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे. ‘युनिकोड कन्सेर्शियम’ या आंतरराष्ट्रीय मानक संस्थेचे सदस्यत्व मिळविण्याच्या कार्यवाहीस प्रारंभ झाला आहे. त्यामुळे मराठी भाषा संगणकीकरण क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रमाणित होईल त्यादृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन रवींद्र नाट्यमंदिर येथे दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मराठी भाषेचे खऱ्या अर्थाने संवर्धन करणाऱ्या अहमदनगर येथील बेबीताई गायकवाड यांना पहिला कविवर्य स्व. मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; तसेच परदेशातून महाराष्ट्रात येऊन मराठी शिकून भाषेचा सखोल अभ्यास करणाऱ्या डॉ. मॅक्सीन बर्नसन यांना पहिला डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुण्याच्या कॉन्टिनेंटल प्रकाशन यांना प्रदान करण्यात आला. स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराने ३५ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मराठी भाषेची स्थित्यंतरे उलगडणारा कौशल इनामदार यांची संकल्पना असलेला ‘मराठीनामा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. (प्रतिनिधी)प्रा. रा.ग. जाधव यांचा निवासस्थानी गौरवविंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रा.ग. जाधव यांना जाहीर झाला आहे. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. मराठी भाषा मंत्री विनोद तावडे २८ फेब्रुवारी रोजी पुणे येथे प्रा. जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार त्यांना देणार आहेत.