शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या कारभारावर सारेच असमाधानी!

By admin | Updated: December 25, 2015 03:11 IST

विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत अजित पवार यांचा आरोप.

अकोला : सत्तेत येण्यापूर्वी युतीच्या नेत्यांनी लोकांना मोठ-मोठी आश्‍वासने दिली. सत्तेत आल्यानंतर त्यांना सर्व आश्‍वासनांचा विसर पडला. या सरकारच्या कामाने शेतकरी, व्यापारी, जनता यापैकी कुणीही समाधानी नाही. युतीच्या सरकारने राज्यातील जनतेचा विश्‍वासघात केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार रवींद्र सपकाळ यांच्या प्रचारार्थ तिन्ही जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक अकोला येथे गुरुवारी सकाळी रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी निधीचा गैरवापर करणार्‍यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन आघाडीच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना केले. त्यांनी वेळी युती सरकारच्या अपयशाचा खरपूस समाचार घेतला. रवींद्र सपकाळ यांच्याबाबत स्थानिक नसून, ते सर्वांना अपरिचित असल्याचा अपप्रचार केला जात आहे. हा आरोप खोडून काढताना पवार म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत पहिल्यांदा निवडणूक लढविणारा उमेदवार हा अपरिचितच असतो. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे, डॉ. राजेंद्र शिंगणे, राधेश्याम चांडक, भारत बोंद्रे, कृष्णराव इंगळे, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. संदीप बाजोरिया, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, ऋषिकेश पोहरे, डॉ. संतोष कोरपे, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड, श्रीकांत पिसे पाटील, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, वाशिमचे जिल्हाध्यक्ष अँड. दिलीप सरनाईक, चंद्रकांत ठाकरे, मदन भरगड, वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, रवींद्र सपकाळ, सचिन वाकोडे, नितीन झापर्डे आदींसह तिन्ही जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. विजय देशमुख यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले.