शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा ठावठिकाणा समजणार

By admin | Updated: July 9, 2016 02:17 IST

धावत असलेल्या एसटी बसचा ठावठिकाणा समजण्यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसेसना ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. बसेसचा ठावठिकाणा समजण्याबरोबरच

मुंबई : धावत असलेल्या एसटी बसचा ठावठिकाणा समजण्यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसेसना ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. बसेसचा ठावठिकाणा समजण्याबरोबरच त्या वेळेत धावत आहेत की नाही याची माहितीही त्यामुळे समजण्यास मदत होईल. ही यंत्रणा बसविण्यासाठी एसटी महामंडळाकडून काही प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार बसेस आहेत. यात साध्या आणि सेमी लक्झरी बस सोडता सर्व शिवनेरी व्होल्वो बसेसना ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे बस सध्या कोणत्या मार्गावर आहे आणि त्यांची सद्य:स्थिती काय आहे हे समजण्यास मदत होते. त्यामुळे बसेसचे वेळापत्रक सुधारण्यासही मदत होत असल्याचे एसटीचे अधिकारी सांगतात. व्होल्वो बस ताफ्यात घेतानाच अशा प्रकारची यंत्रणा बसविण्याची अट कंत्राटदारांना आधीच घालण्यात आली होती. त्याचा बराच फायदा होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने सर्व साध्या आणि निम आराम बसना ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धावत असलेल्या एसटी बसचा ठावठिकाणा समजेल. त्याचप्रमाणे एखाद्या नियोजित आणि अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास त्याची माहितीही महामंडळाला समजेल आणि त्यानुसार कारवाईदेखील चालक व वाहकांवर करता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे एसटी बस आगार आणि स्थानकात वेळेवर न पोहोचण्याचे कारण यातून समजेल. त्यानुसार त्या मार्गांवरील बसेसचे वेळापत्रक सुधारण्यावरही यातून भर देता येईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)- अपघात झाला तर तो कोणत्या ठिकाणी झाला आहे आणि त्या ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. ही यंत्रणा चांगल्या तऱ्हेने राबवण्यासाठी एक नियंत्रण कक्षही तयार केला जाईल. सध्या व्होल्वो एसी बसला जरी ही यंत्रणा असली तरी ती परस्परित्या हाताळण्यात येत असून त्यासाठी नियंत्रण कक्ष सध्या तरी नाही. त्यामुळे सर्व बसेस या यंत्रणेखाली आणताना एक नियंत्रण कक्षही स्थापन केला जाणार आहे. एसटी बसना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसविण्याचा विचार केला जात आहे. त्याची निविदा प्रक्रिया मात्र अजून झालेली नाही. या यंत्रणेमुळे एसटी बसचा ठावठिकाणा समजण्यास मदत मिळेल. - दिवाकर रावते (परिवहन मंत्री व एसटी अध्यक्ष)